बोगस डॉक्टर प्रकरणातील त्या डॉक्टरांचा अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळ

0
784

पोलिसांच्या योग्य तपासावर शिक्कामोर्तब

अकोट/संतोष विणके – शहरात गाजत असलेला बोगस डॉक्टर निखिल गांधी प्रकरणात आरोपी असलेले डॉक्टर केला, व डॉक्टर गांधी ह्यां डॉक्टरांचा अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याची माहीती शहर पोलीसांनी दिली .अटकेपासून बचाव करण्या साठी विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायालय अकोट येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता ,अटकपूर्व जामीन मिळावी म्हणून विधितज्ञा ची फौज ही दोन्ही डॉक्टरांनी लावली होती परंतु तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे ह्यांनी पोलिसांची बाजू उत्तम पणे मांडल्याने विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायधीश गणोरकर ह्यांनी दोन्ही बाजू ऐकून दोन्ही आरोपीची अटकपूर्व जामीन फेटाळून लावला, अकोट शहरातील सिटी हॉस्पिटल हे कोणतीही पूर्व परावनगी न घेता बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट चा भंग केला व आपल्या दवाखान्यात कोणतीही पडताळणी न करता स्वतः च्या आर्थिक फायद्या साठी बोगस डॉक्टर निखिल गांधी ह्याला बाह्य रुग्ण विभाग ताब्यात देऊन रुग्णांच्या जीविताशी खेळवाड केला असा आरोप पोलिसांनी लावून, डॉक्टर श्याम केला, डॉक्टर धनराज राठी व बोगस डॉक्टर निखिल गांधी ह्यांचे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता, अकोट शहरातील नावाजलेल्या डॉक्टर केला व डॉक्टर राठी ह्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज विद्यमान न्यायालयाने फेटाळल्याने एक प्रकारे पोलिसांच्या तपासावर शिकमोर्तबच केले, आरोपींची अटकपूर्व जामीन रद्द झाल्याने त्यांचे अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे यावेळी स पोलीसांची बाजु सरकारी वकीलॲड.अजित देशमुख यांनी मांडली.