रायतेवस्ती येथील जि.प.शाळा येथे गोपाळकाला व दहिहंडी उत्साहात साजरी

0
947
Google search engine
Google search engine

नाशिक(प्रतिनिधी)

जि.प.शाळा रायतेवस्ती खडकमाळेगाव ता.निफाड येथे गोपाळकाला व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या राधाकृष्णाच्या वेशभूषा लक्ष वेधून घेत होत्या…यावेळी उपस्थित शिक्षणप्रेमी नागरिकांच्या हस्ते दहीहंडीचे पुजन करण्यात आले.. मुलांनी नाचण्याचा..गरबा खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.त्यानंतर शाळेच्या गोविंदा पथकाने थरावर थर रचत दहिहंडी फोडली…यानंतर विद्यार्थ्यांनी आणलेल्या शिदोऱ्या एकत्र करून गोपाळकाल्याचा आनंद घेतला.

यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब क्षिरसागर यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरिक नारायण रायते,पंढरीनाथ रायते,नभाजी राजोळे,मच्छिंद्र राजोळे,सागर रायते,गोकुळ राजोळे,स्वप्निल राजोळे,अनिकेत राजोळे,चेतन रायते,सरला साळवे,संगिता रायते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते..शाळेतील शिक्षक शशिकांत पाटील यांनी सुत्रसंचलन केले..तर मुख्याध्यापक गोरख देवढे यांनी उपस्थितांचे आभार मानले.