लाच घेताना नायब तहसीलदाराची हॅट्रिक

0
1312
Google search engine
Google search engine

नितीन ढाकणे,दिपक गित्ते
बीड आष्टी : सोमवारी सकाळी आष्टी तहसीलमधील पुरवठा विभागाचा नायब तहसीलदार सुभाष बालचंद्र कट्टे याला स्वस्त धान्य दुकानाचा वार्षिक अहवाल चांगला देण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारताना बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. मागील पाच दिवसातील बीड एसिबीची हि पाचवी कारवाई आहे.

एका संस्थेच्या नावे असलेल्या स्वस्त धान्य दुकानाचा वार्षिक अहवाल चांगल्या पद्धतीने वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यासाठी सुभाष कट्टे याने दोन हजारांची लाच मागितली होती.
याची तक्रार बीड एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची खातरजमा करून बीड एसीबीने सोमवारी सकाळी आष्टी तहसील परिसरात सापळा रचला. सुभाष कट्टे याने तक्रारदाराकडून दोन हजारांची लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात कट्टे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक एस.आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील,पोलीस कर्मचारी दादासाहेब केदार, अशोक ठोकळ,विकास मुंडे, अमोल बागलाने, सय्यद नदीम यांनी पार पाडली.