‘प्रहार’च्या इशाऱ्यानेच दर्यापूर पंचायत समिती लागली कामाला – येवदा, वडनेरगंगाई येथील आठवडी बाजाराचे रूप पालटल्याने गावकरी आनंदी

0
1404
Google search engine
Google search engine
विशेष प्रतिनिधी / येवदा-
दर्यापुर तालुक्यातील येवदा, वडनेरगंगाई येथील आठवडी बाजाराच्या परिसरात मोठमोठे खड्डे पडले असल्याने तसेच सर्वत्र चिखल साचल्याने विक्रेत्यांना बसण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे आठवडी बाजारात भाजीपाल्यांची व इतर  दूकाने चक्क चिखलात मांडली जात होती.ही बाब  आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असल्याने,प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दर्यापुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सुधीर अरबट यांच्या दालनात प्रहारचे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीप्रदिप वडतकर, विधानसभा श्री प्रदिप चौधरी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांंच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
गटविकास अधिकारी यांनी प्रहारच्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन येवदा,वडनेरगंगाई येथील आठवडी बाजारातील पाहणी करून खड्डे बुजवण्यासाठी व परिसरातील साफसफाई करिता ग्रामपंचायत प्रशासनास लेखी पत्र दिले होते. त्या अनुषंगाने  येवदा व वडणेरगंगाई  ग्रामपंचायत प्रशासनाने आठवडी बाजारातील खड्डे व परिसरातील साफ सफाई केल्याने विक्रेत्यांना बसण्यासाठी उपलब्धता झाली आहे. प्रहारची या प्रश्ना बाबत आक्रमक भुमिका व प्रसारमाध्यमांनी घेतलेली दखल या मुळेच गावातील आठवडी बाजारातील खड्ड्यांची समस्या मार्गी लागल्याची प्रतिक्रिया व समाधान यावेळी येवदा,वडनेरगंगाई ग्रामस्थानी व्यक्त केली.