आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आयशर टेम्पोत विक्रीसाठी आणलेला 36 लाख रुपयांचा गोवा पकडला.

0
881
Google search engine
Google search engine

परळीत ही अशा कारवाही ची अपेक्षा

प्रतिनिधी :- नितीन ढाकणे , दिपक गित्ते

केज : आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आयशर टेम्पोत विक्रीसाठी आणलेला 36 लाख रुपयांचा गोवा गुटख्यासह एकुण 45 लाख रुपयाचा मुद्देमाल केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकात डिसले यांनी मंगळवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता केज शहरातील धारुर चौकात जप्त केला आहे.

आंध्र प्रदेशातुन परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे आयशर टेम्पो मधुन 36 लाख रुपयांचा गोवा गुटखा घेऊन जात असलेला आयशर टेम्पो केज शहरातुन धारुर कडे जाणार्‍या रस्त्याने जात असल्याची गोपनीय माहिती केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाल्याने डिसले यांनी सकाळी सहा वाजल्या पासुन केज शहरातील रस्त्यांची नाकाबंदी केली असता केज शहरातील धारुर चौकातुन धारुर कडे जात असलेला आयशर टेम्पो क्रमांक क्रमांक एम एच 04 एच डी 4923 यास पाठलाग करून धारुर रस्त्यावरील भवानी माळावर पकडुन टेम्पोची झडती घेतली असता टेम्पो मध्ये मध्ये पस्तीस लाख रुपयांचा गोवा गुटख्याचे 50 पोते आढळून आला तसेच गुटख्याच्या वाहतूकीसाठी वापरण्यात येणारा आठ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पोसह एकुण 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हि कारवाई पोलीस उपअधीक्षक श्रीकांत डिसले सह पोलीस काॅन्सटेबल एस डी राठोड , एस डी अंहकारे , जे ए शेख , डी बी रहाडे , एच जी इंगोले , व्ही व्ही राऊत यांनी केली आहे. या प्रकरणी टेम्पो चालक मिरजा मुसा शेख व क्लिनर सलीम अहमद शेख (रा. बार्शी) या दोघा विरोधात अन्न व औषध प्रशासन यांचे अधिकारान्वये कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्या या कारवाईने अवैधरीत्या गुटखा विक्री करणारांचे धाबे दणाणले आहेत.

आंध्र प्रदेशातुन गोवा घेऊन परभणी जिल्ह्यातील पाथरी कडे जात असलेल्या आयशर टेम्पो चालकास कोणत्या मार्गाने कसे जायचे या बाबत रस्त्याची माहिती एका कागदावर लिहून देण्यात आली होती.