बिल प्रिंटींग एजन्सी चुकी भोवणार महावितरण ग्राहकाला

0
984
Google search engine
Google search engine

बिल प्रिंटींग एजन्सी चुकी भोवणार महावितरण ग्राहकाला.
श्रीकृष्ण कॉलनी मधील अजून वीज देयक मिळाले नाही.,अभियंता म्हणतात एजन्सी ला पत्र दिलय..

चांदुर बाजार:-
उपविभागीय महावितरण कार्यलाय चांदुर बाजार अंतर्गत केंद्रीय वीज बिल प्रणाली सुरू झाली असून आता महावितरण च्या ग्राहकाच्या मिटर चे वाचन दिलेल्या ठराविक दिनाकालाच घेणे बंधनकारक आहे. तर केंद्रीय बिल प्रणाली मुळे ग्राहकांना वीज देयके भरण्याकरिता अधिक कालावधी मिळावा या यामागील हेतू असल्याचं दिसून येते आहे.या मध्ये ग्राहकाच्या मीटर चे वाचन झाल्यावर शहरी भागात 24 तासात तर ग्रामीण भागात 48 तासात बिलाचे देयक मिळणार आहे. मात्र चांदुर बाजार महावितरण कार्यलाय शहर अंतर्गत येणाऱ्या श्रीकृष्ण आणि टोम्पे कॉलनी मधील जवळ पास 300-500दरम्यान चे बिल देयके अजूनही मिळाले नाही.त्याचा आर्थिक फटका हा ग्राहकाला बसणार हे नक्की.

महावितरण देयके भरण्याची पहिली दिनांक 27 ऑगस्ट होती.या दिनांक नंतर ग्राहकांनी देयके भरल्यास त्यांना 10 रुपये विलंब शुल्क भरावा लागतो.आज 3 सप्टेंबर अजून देखील ग्राहक याना देयके मिळाले नाही.त्यामुळे ग्राहकांना याचा फटका बसणार हे नक्की..तर देयक भरण्याची दुसरी दिनांक 6 सप्टेंबर आहे.रीडिंग एकाच दिवशी आणि देयके वेवेगळ्या वेळी अशा प्रकार चांदुर बाजार शहर कार्यलाय अंतर्गत दिसत आहे.तर या संबधी अभियता यांच्या संपर्क केला असता.त्यांनी आपली जबाबदारी फेटाळून लावल्या सारखे उत्तर दिले.

प्रतिक्रिया:-
1)”देयकाची छपाई झाली नाही त्यामुळे ग्राहकांना देयक मिळाले नाही.छापाई झाली ग्राहकांना देयक देण्यात येतील.”
विपुल बनवरे सहायक अभियंता शहर चांदुर बाजार महावितरण कार्यलाय.
2)जवळपास सर्व देयके वाटण्यात आले.मात्र 300 च्या जवळ पास रीडिंग ची फाइल चे बिल आहे नाही.ही फाइल शुक्रवारी देयके प्रिंटींग करीता पाठविली आहे.ग्राहकांना याचा आर्थिक त्रास होणार आहे.या बाबत आम्ही एजन्सी ला पत्र देणार आहे.
सुधीर वानखडे उपकार्यकरी अभियंता चांदुर बाजार महावितरण कार्यलाय.
*बॉक्समध्ये*
“तर प्रिंटींग एजन्सी च्या चुकीमुळे ग्राहकांना जो आर्थिक भुरदंड ग्राहकाला सहन करावा लागत आहे.तो एजन्सी कडून वसूल केला जाणार का?हा प्रश्न देखील महावितरण ग्राहक कडून होते आहे.”