उस्मानाबादेत होणार एकांकिका राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा

0
761

उस्मानाबाद : गतवर्षीच्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अभूतपूर्व मेजवानीनंतर उस्मानाबादकराना यंदाही विविध ठिकाणच्या कलावंतांच्या बहारदार कलाविष्काराची मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार आहे. दि. ७ते ९ सप्टेंबर या कालावधीत आयोजित राज्यस्तरीय “गंगाधर” करंडक एकांकिका स्पर्धेचे २आयोजन करण्यात आले असून यात राज्यातील ४२ संघांनी नोंदणी केली असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.नाट्य परिषद जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेविषयी माहिती देण्यात आली. यावेळी सिनेअभिनेते मोहन जोशी, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे, कार्याध्यक्ष धनंजय शिंगाडे उपस्थित होते.या स्पर्धेसाठी एकूण ४२ संघांनी नोंदणी केली असून मुंबईच्या सर्वाधिक १६ संघांचा यात समावेश आहे. त्याचबरोबर ठाणे, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, सोलापूर, लातूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या संघाला 51 हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे. अखिल भारतीय

नाबानाट्य परिषद व रामकृष्ण परमहंस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील नगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यसंकुलात होणाऱ्या या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नाट्य परिषद जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.