८ सप्टेंबरला ठरणार धनगर आरक्षणाची दिशा

0
1171
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद -चौंडी ता जामखेड जिल्हा आहमदनगर येथे धनगर समाजाचा ८ सप्टेंबर ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतीथी निमित्ताने २२३ वा राज्यस्तरीय पुण्यतीथी सोहळा संपन्न होणार आहे .त्यानिमीत्ताने महाराष्ट्र धनगर धनगर समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळाव्यात धनगर समाज आरक्षण व पुढिल दिशा या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक धनगर समाज महासंघाचे प्रदेश सरचीटणीस चंद्रकांत बनसोडे यांनी दिले आहे