महालखेडा च्या शाळेत चिमुकल्यांनी बनविल्या कागदाच्या लगदया पासून पर्यावरणपूरक गणेशमुर्ती

0
776
Google search engine
Google search engine

येवला/प्रतिनिधी- संतोष बटाव

येवला तालुक्यातील महालखेडा जि. प.प्रा शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम पारपडला. पर्यावरण संवर्धन व्हावे प्रदूषण कमी व्हावे यासाठी विद्यार्थ्यांना रद्दी कागदाच्या लगदया पासून तसेच शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मुर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन शाळेतील उपक्रमशील मुख्याध्यापक श्री संतोष बुधवंत सर व श्रीमती सुप्रिया मुळाटे मॅडम तसेच श्रीमती पारखे मॅडम यांनी केले. बाजारात मिळणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणेश मुर्ती विसर्जन केल्यावर पाण्याचे प्रदुषण होते. तसेच त्यामुळे पर्यावरणाचा कसा र्‍हास होतो याची माहिती शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री ज्ञानेश्वर पायमोडे सर यांनी मुलांना दिली. विद्यार्थ्यांना उपक्रमाच्या माध्यमातून अध्ययन अनुभव देऊन शिक्षण हे आनंददायी व मनोरंजक होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागली आहे. असे प्रतिपादन शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री दिपक पारखे यांनी केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेश मुर्ती पाहून पालक मा. सरपंच शिवाजी खांडेकर श्र सोपान पवार तुकाराम हलवर नामदेव खांडेकर रामदास खांडेकर भाऊसाहेब खांडेकर यांनी मुलांचे कौतुक केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संतोष बुधवंत सर ज्ञानेश्वर पायमोडे सर श्रीमती सुप्रिया मुळाटे मॅडम तसेच श्रीमती पल्लवी पारखे मॅडम यांनी प्रयत्न केले.
……………………………………..
येवला/ प्रतिनिधी – संतोष बटाव मो.9850576769