संस्कार प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

391
जाहिरात

महादेव गित्ते
————————————————————-
परळी वैजनाथ, दि.०५

संस्कार प्राथमिक शाळेत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका परळी भूषण प्राप्त श्रीमती गित्ते पी.आर. मॅडम पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपकजी तांदळे सर शाळेतील माजी मुख्याध्याक श्री कराड सर श्रीमती जाधव मॅडम यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी श्री दिपकजी तांदळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले कि.आई वडिलांनंतर आपल्या आयुष्याला खरे वळण लावण्यात गुरुजनांचा फार मोठा सहभाग असतो हे आपण कधीही विसरून चालणार नाही तसेच यावेळी ३ री वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा करून वर्गाध्यापन केले व सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
यावेळी शाळेतील शिक्षक श्री पाचंगे सर यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षीरसागर सर यांनी तर सूत्रसंचालन उरगुंडे सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री पल्लेवाड सर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।