देऊरवाडा येथील ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमी च्या कामात भ्रष्टाचार, गावकरी यांची तहसीलदार,गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार.

0
1375
Google search engine
Google search engine

देऊरवाडा येथील ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमी च्या कामात भ्रष्टाचार, गावकरी यांची तहसीलदार,गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार.
ग्रामविकास अधिकारी यांनी फेटाळून लावली आपली जबाबदारी.

चांदुर बाजार:-प्रतिनिधी
तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देऊरवाडा ग्रामपंचायत कार्यलाय मधील महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्ये ग्राम रोजगार सेवक यांनी भ्रष्ट्राचार केला असल्याचा आरोप गावातील मजूर वर्ग यांनी केला आहे .यामध्ये ग्राम विकास अधिकारी यांनी आपली जबाबदारी फेटाळून लावली असून त्यांनी रोजगार सेवक हे स्वतंत्र काम करत असतात असे सांगितले. रोजगार गावकरी याना रोजगार हमी अंतर्गत काम करून सुद्धा पैसे मिळाले नसल्याने त्यांनी आपली तक्रार चांदुर बाजार दंडाधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कडे दिली आहे. तसेच चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सुद्धा प्रकाश मनोहरे या रोजगार न मिळालेल्या व्यक्ती ने केली आहे.तर या प्रकरणामुळे गावतील नागरिक यांच्या मध्ये ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रति रोष पहायला मिळत आहे.

गावात काम आणि कामप्रमाने दाम हे उद्दिष्ट ठेवून या योजने सुरुवात केली जात होती.मात्र या मध्ये शुद्ध ग्रामीण पातळीवरील भ्रष्ट्राचार होत असल्याचे दिसत आहे.तसेच ज्याच्या नावाने देऊरवाडा ग्रामपंचायत कार्यलाय मध्ये मस्टर टाकून पैसे काढण्यात आले ते कधीच कामावर गेले नसल्याचे गावकरी यांनी सांगितले.तर नातेवाईक याना च लाभ देण्यात आला असल्याचे शुद्ध समोर आहे. त्यामुळे या मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसत आहे.ग्राम रोजगार सेवक यांनी एकूण 7 रोजगार याचे मस्टर काढून पैसे दिले आहे त्यापैकी 3 मजूर कामावर असल्याचा ही आरोप मनोहरे यांनी केला.

प्रतिक्रिया:-
1)मी महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत स्मशानभूमीत खड्डे खोदले मात्र जे मजूर कामावर नव्हते त्याचे पैसे निघाले आणि मी काम करून शुद्ध मला पैसे मिळाले नाही.
प्रकाश मनोहरे रोजगार देऊरवाडा

2)ग्रामपंचायत कार्यलाय मध्ये रोजगार हमी अंतर्गत अश्या प्रकारचा भ्रष्टाचार होते आणि ग्रामविकास अधिकारी याला खतपाणी घालत असल्याचे दिसते त्यामुळे याची चौकशी होऊन कार्यवाही होने हे अपेक्षित आहे.
बब्बू भाऊ माजी उप सरपंच देऊरवाडा

3)त्यांनी तक्रार दिली आहे.चौकशी व्हायची आहे.रोजगार सेवक मजुरांचे मस्टर भरत असून तो रोजगार हमी चा गाव पातळीवर प्रमुख असतो.
बडासे ग्रामविकास अधिकारी देऊरवाडा ग्रामपंचायत कार्यलाय