उस्मानाबाद -बेंबळी हद्दीत दारुचा महापूर

0
1272
Google search engine
Google search engine

राजुरी-चिखली-दारफळ परिसरात अवैध्य धंद्याचा सुळसुळाट.

माञ पोलिस याकडे लक्ष देणार का ?

उस्मानाबाद / (राजुरी प्रतिनीधी) — उस्मानाबाद तालुक्यातील राजुरी चिखली दारफळ परिसरात अवैध्य धंद्याचा सुळसुळाट झाल्याचे चिञ दिसत आहे, मटका जुगार गावठी दारुची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असुन , गोरगरिबांचे संसार उद्वस्थ होत आहेत , या परिसरातील युवक व वृद्ध माणसे “कल्याण मुंबई नावाच्या मटक्यासाठी लाखो रुपये बरबाद करत आहेत ,
कल्याण मटका युवकांना जेवु देत नाही तर मुंबई मटका झोपु देत नाही , अशी बिकट व्यवस्था झाल्याचे चिञ दिसत आहे , तसेच खुलेआम दारुविक्री मोठ्याप्रमाणात सुरु इहे, माञ पोलिस याकडे लक्ष देत नसल्याने या अवैध्य धंद्याना,आळे बसणार का याकडे नांगरिकाचे लक्ष वेधले आहे , जिकडे बघेल तिकडे कोण दारु पिऊन पडलेला दिसतो तर कोण जुगार मटका खेळताना दिसत आहेत , माञ याकडे नुतन पोलिस अधिक्षक आर राजा स्वामी साहेब लक्ष देतील का असा प्रश्न निर्माण होत आहे..