कोतवडे गावचा ऐतिहासिक निर्णय

0
1111
Google search engine
Google search engine

सांगली
सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्याच्या पश्र्चिम टोकावर आणि सह्याद्री पर्वतरांगेच्या शेवटच्या टोकावर डोंगर कुशीत वसलेले कोतवडे गाव आहे.हे गाव निसर्गावर निस्सिम प्रेम करणारे हजार बाराशे लोकसंख्या असणारे कोतवडे गाव.या गावाने गावातील नागरिकांच्या मृत्यु नंतर रक्षा पाण्यात विसर्जित न करता वृक्षारोपण करून ती रक्षा वृक्षारोपण केलेल्या खड्ड्यात अर्पण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.निसर्गाशी नाते जपणारे गाव अशी पंचक्रोशीत ख्याती असलेले कोतवडे गाव दुष्काळी पट्ट्यात मोडणाऱ्या या गावाने समाजासमोर मापदंड घालून दिला आहे.कोतवडे गाव जरी लहान असलेतरी गावात आठरा पगड जाती जमाती वास्तव्यास आहेत.अधुनिक युगात नागरिकांच्या मृत्यु नंतरची रक्षा वृक्षारोपण करून त्या खड्ड्यात रक्षा विसर्जीत करण्याचा धाडसी पण तितकाच समाज उपयोगी,निसर्गोपयोगी निर्णय घेऊन समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे.सह्याद्री पर्वत रांगेच्या शेवटच्या किनाऱ्यावर डोंगराच्या उतरंडिला कोतवडे गाव वसले आहे डोंगरी गाव म्हणूनही कोतवडे गावचा समावेश आहे.कोतवडे गावचे तरूण तडफदार धडाडीचे युवा सरपंच संभाजी यादव यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या ग्रामसभेत धाडसी पण समाज उपयोगी निर्णयाचा ऐतिहासिक ठराव करण्यात आला.व या ठरावाला ग्रामस्थांनी एकमुखाने पाठींबा दिला.केवळ ठराव घेवुन थांबले नाही तर प्रत्यक्ष कृतीही केली.मृत्युनंतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर उर्वरित रक्षा नवे झाड लावुन चर्या खड्डयात ती रक्षा विसर्जित करायची या एकमुखी ग्रामस्थाच्या सहभागाबद्दल कोतवडे गावचे सरपंच संभाजी यादव यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.