श्रीराम मंदिर संस्थान शनिवारआकोट येथे श्रीमद् भागवत सप्ताहाची समाप्ती..

0
738

आकोट(प्रतिनिधी) – हभप सचिन देव महाराज यांच्या अमृत वाणीतुन
श्री संत अच्युत महाराज श्रीमद् भागवत सामितीच्या वतीने आयोजीत केलेला भागवतकथा सप्ताह काल संपन्न झाला.
श्रीराम मंदिर संस्थान शनिवार येथे श्री संत अच्युत महाराज श्रीमद् भागवत सामितीच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यात श्रीमद् भागवत कथा चे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या १४ वर्ष पासून सेवा सुरू आहे. दि.३०/०८/२०१८ ते ५/०९/२०१८ पर्यंत आयोजन करण्यात आले होते. आज श्रीमद् भागवत कथा प्रवचनाची सांगता करण्यात आली. यावेळीउदबोधन करतांना ,
हभप सचिन देव महाराज सांगतात की, भागवताच्या प्रथम स्कंध ते व्दादश स्कंधात भागवत कथेचे सार आहे. प्रत्येक स्कंधाची गोष्ट उदाहरण देऊन पटवून सांगितले. भागवत कथा सांगतात ज्याच्या मुखातून तुम्ही ऐकावी म्हणजे श्रीकृष्ण-स्वरूप-दर्शन तुम्हाला होईल. कलियुगात नामचिंतन श्रेष्ठ आहे. भागवत व भगवंत ही दोन भासणारी तत्वे एकरुप आहेत हाच भागवताचा मतितार्थ असून ज्ञान,वैराग्य व भक्ती वाढविण्यासाठी तत्त्वज्ञान हेच श्रीमद् भागवत होय.
भक्त उध्दवाला श्रीकृष्णाचा दिव्य उपदेश या भागवताचा कळस होय. भक्ती शिवाय मानवी जीवांचे कल्याण नाही. श्रीकृष्णाचा जन्म, त्यांच्या लिला, त्याचे कार्य, तसेच श्रीकृष्णाचे मंगलमय चरित्र देखाटले.
संत अकोट नगरात संत अच्युत महाराजांनी बरेच वर्षी प्रवचने झाली ती परंपरा कायम आहे. श्रीमद् भागवत कथेला हामोनियम साथ श्री.मधुकरराव वाकोडे गुरुजी, तब्बल संगत सुभम देवळे, साथसंगत एकनाथ देवळे यांनी केले. या सर्व चा सत्कार श्री संत अच्युत महाराज भागवत समिती व श्रीराम मंदिर संस्थान वतीने करण्यात आला. श्रीमद् भागवत कथा यशस्वी होण्यासाठी श्री.सुनिल अपराधे, चंद्रशेखर सुपासे, मंगेश अपराधे, गणोरकर, निखिल महल्ले, शशांक पाटील ,पद्माकर महाजन, मोहन जती व श्री संत अच्युत महाराज भागवत कथा समितीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रम असे वामन जकाते यांनी कळवलेआहे.