आकोटात गोविंदा पथकांच्या उत्साह उधाणात दहीहंडी महोत्सवाची धुम

0
1613
Google search engine
Google search engine

आकोट(संतोष विणके)- दरवर्षी प्रमाणे यावर्षी पन अहिर गवली समाज अकोट व अहीर नवयुवक संघटना, ग्वाला ग्रुप च्या वतीने आला रे आला गोविंदा आला दहीहंडी उत्सवाचे आयोजन काल दि: ६ सप्टे. ला करण्यात आले होते. यावेळी शहरात विविध चौक तथा मोहल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या.शोभायात्रेची सुरुवातश्री नरसिंग महाराज मंदिर येथुन दुपारी 1 सुरु झाली.तर सांगता गवळी पुरा चौकात रात्री ८ वा.अतीम हंडी फोडुन करण्यात आला.या उत्सवात शहरातील विविध आखाड्यांच्या नवयुवकांनी उत्साहात सहभाग घेतला होता.दरम्यान यावेळी शहरात ठीकठीकाणी दहहंडीची मजा बघण्यासाठी नागरीकांनी तोबा गर्दी केली होती.तर शोभायात्रेसह दहीहंडी उत्सवासाठी आकोट शहर पोलीसांनी ठीकठीकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.