चांदूर रेल्वे येथे भाजपा तालुका कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न

0
825
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
स्थानिक अग्रवाल समिती धर्मशाळा येथे भारतीय जनता पार्टीचा तालुका कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग नुकताच संपन्न झाला.
प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन माजी आ. अरूण अडसड यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, प्रताप अडसड, जिल्हा सरचिटणीस हरिचंद्र खंडाळकर, रविराज देशमुख, राजेश्वर निस्ताने, तालुकाध्यक्ष आशुतोष उर्फ पप्पु गुल्हाणे, शहराध्यक्ष प्रसन्ना चौधरी (पाटील), जेष्ठ कार्यकर्ते उत्तमराव ठाकरे, माजी पं.स. सभापती डॉ. हेमंत जाधव, मुरलीधर मुंधडा, संदिप सोळंके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी दिनेश सुर्यवंशी यांनी बुथ बांधणी, बुथ गठीत करणे तसेच शासनाने केलेल्या कामाची माहिती देवुन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अरूण अडसड यांनी जनसंघ ते भाजपा या विषयावर आपले विचार मांडले. या संपुर्ण कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस संदिप सोळंके यांनी केले.
कार्यक्रमाला भाजपा महिला आघाडी, किसान आघाडी, युवा मोर्चा, सर्व आघाडी व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.