माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने राहुल कांबळे याने शिक्षक दिनाच्या निमित्ताने बुके देऊन मला शुभेच्छा दिल्या.

0
662
Google search engine
Google search engine

येवला (संतोष बटाव)

माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने राहुल कांबळे याने शिक्षक दिनाच्या निमित्ताने बुके देऊन मला शुभेच्छा दिल्या. खरच मुलांना सुद्धा किती हेवा असतो आपल्या शिक्षकांचा… आणि खरच वाटतं कधीच मुक्त होऊ नये या बंधनातून. आमच्या जोडीला प्रत्येक मुलगा एक शिक्षकाचे काम करत असतो. पश्चात मोठी मुले हि लहान मुलांना सांभाळतात, शाळेची शिस्त, नियम त्यांना शिकवतात. अभ्यास कसा करावा? पासून तर आज कोणता खेळ घ्यायचा?, प्रत्यक्ष अध्ययन अनुभवातून खूप काही शिकतात, कधी कधी विचार पडतो कि एवढा समंजसपणा यांचेकडे आला कसा? तेव्हा हळूच भूतकाळाकडे डोकावून पाहतो तर जेवढी मुले शाळेतून शिकून गेली ती आठवतात.
आणि
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे,
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
आतापर्यंत १७२ मुले या शाळेतून शिक्षण घेत आहेत व काही घेऊन आपल्या वाटा स्वछंद शोधत आहे. त्यांना देखील यशाच्या वाटा सापडू दे व जेव्हा केव्हा भेटतील तेव्हा तेव्हा मला त्यांचा अभिमान वाटावा कि हे माझे विद्यार्थी. आणखी काय पाहिजे गुरुदक्षिणा.
प्रतिनिधी /संतोष बटाव येवला मो.9850576769