येवला तालुक्यातील सायगाव व पाटोदा च्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या नवीन इमारतींचे बांधकाम करण्याची छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित सुचनेद्वारे मागणी

0
629
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी/संतोष बटाव येवला

येवला तालुक्यातील सायगाव व पाटोदा च्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या नवीन इमारतींचे बांधकाम करण्याची छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित सुचनेद्वारे मागणी केलेली होती. सदर इमारतींच्या बांधकामाचा २०१८ -१९ च्या आराखड्यात समावेश करण्यात आला असून यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती छगन भुजबळ यांना पशुसंवर्धन,दुग्धविकास आणि मत्स्य विभाग मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे. याबाबत सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी डॉ गर्जे, पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी जि प नाशिक यांच्याशी सविस्तर चर्चा करतांना जि प सदस्य महेंद्रशेठ काले, सायगावचे माजी सरपंच गणपतराव खैरनार, माजी सरपंच गोरख उशीर, देविदास जानराव सर, सायगाव सोसायटी चेअरमन गणपत उशीर, एकनाथ चांदर सह आदी.