आत्मा मालिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

0
772

प्रतिनिधी / संतोष बटाव येवला

येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल व ज्युनियर कॉलेजमध्ये विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यामध्ये योजनेच्या माध्यमातून फक्त जनजागृती न करता प्रत्यक्ष कृतीमधून विविध गोष्टी कशाप्रकारे बिंबवल्या जातील यावर गुरुकुलाचे अध्यक्ष मा.श्री हनुमंतराव भोंगळे व प्राचार्य श्री राजेश पाटील यांचा भर असतो.
याचाच एक भाग म्हणून शाळेत यावर्षी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यापुर्वी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शाडू मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर कार्यशाळेस इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ८ विद्यार्थ्यांचा एक याप्रमाणे विद्यार्थ्यांचे ६ गट तयार करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी १० गणपतीच्या शाडू मातीच्या मूर्ती बनविल्या.शाळेतील कलाशिक्षिका श्रीमती शीतल कोळस व यांनी शाडू मातीचे गणपती बनविण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणपती बनविण्याचा आनंद घेतला. सदर उपक्रम विद्यार्थी फक्त गणपती बनविण्यापुरता मर्यादित ठेवणार नाहीत. विद्यार्थी या गणपतींची प्रतिष्ठापना शाळेत व निवडक विद्यार्थ्यांच्या घरी करणार आहेत. लहानपनातच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनात उचललेले पाऊल नक्कीच बहुमुल्य आहे.
सदर उपक्रम राबविताना गुरुकुलाचे अध्यक्ष मा.श्री हनुमंतरावजी भोंगळे साहेब ,प्राचार्य राजेश पाटील व कलाशिक्षिका शितल कोळस मॅडम तसेच मृणालिनी देवरे,रुपाली सोनवणे इतर शिक्षक आणि शिक्षिका यांचे बहुमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
प्रतिनिधी/. संतोष बटाव . येवला मो.9850576769