नक्षलवाद्यांच्या समर्थकांना विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठांना हिंदु दहशतवादी म्हणायचे, हीच आजची धर्मनिरपेक्षता – अमरावती येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन संपन्न

0
1236
Amravati :- नालासोपारा स्फोटक प्रकरण आणि दाभोलकर हत्या प्रकरणी गेल्या महिनाभरात ९ हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली. यांपैकी कुणीही सनातन संस्थेचे साधक नसतांना सनातन संस्थेवर बंदी घाला, अशी बिनबुडाची आणि उथळ मागणी काही राजकीय पक्ष, संघटना, तथाकथित पुरोगामी, मुसलमान नेते आदी करत आहेत. काही प्रसारमाध्यमे सनसनाटी आणि दिशाभूल करणार्‍या बातम्या प्रसारित करून हिंदु आतंकवादाचा ढोल बडवत आहेत; मात्र दुसरीकडे कोरेगाव-भीमा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांच्या समर्थकांना सोयीस्करपणे पाठीशी घातले जात आहे, हा दुटप्पीपणा आहे. हिंदूंवरील गुन्हे सिद्ध न होताही त्यांना हिंदु दहशतवादी म्हणणार्‍यांचा आणि नक्षलवाद्यांना विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून उदात्तीकरण करणार्‍यांचा खरा चेहरा समोर आला आहे. हिंदूंनो, तुम्हाला कोणासोबत जायचे हे ठरवण्याची हीच वेळ आहे ! धर्मपरायण सत्यनिष्ठ सनातन संस्थेच्या बाजूने यायचे कि धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामित्व यांचा बुरखा पांघरून नक्षलवाद्यांना समर्थन करायचे ?, असा प्रश्‍न करत धर्माचे रक्षण करणार्‍यांचेच धर्म अर्थात ईश्‍वर रक्षण करतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी या वेळी केले. आज शनिवार दिनांक ८ सप्टेंबर २०१८ यादिवशी सायंकाळी ४ ते ६ यावेळेत घेण्यात आले.नालासोपारा स्फोटक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निष्पाप हिंदुत्ववाद्यांच्या समर्थनार्थ आणि सनातन संस्थेवर अन्याय्य मागणीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी   हिंदु जनजागृती समितीचे अनुभूती टवलारे, निलेश टवलारे,  अमोल जगदाळे,  आनंद डाऊ, हेमंत खत्री, जय देशमुख, सनातन संस्थेचे सौ. विभा  चौधरी, गिरीष कोमेरवार, विकास चौधरी, संगीता ठाकरे, अर्चना रावळे, शिला ठाकरे, स्मिता ठाकरे, शबरी देशमुख, चारुलता भुराळकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्ववादी संघटना यांना लक्ष्य करणार्‍या षड्यंत्राचे अन्वेषण करून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
     या आंदोलनामध्ये नक्षलवाद्यांच्या समर्थकांना विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आदी म्हणणार्‍यांचाही निषेध करण्यात आला. एल्गार परिषदेच्या आयोजक आणि सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रीय सदस्य सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्या तपासामध्ये राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणे, सरकार उलथवून टाकून युद्ध पुकारणे आदी अतिशय गंभीर आणि धक्कादायक बाबी उघड झाल्या अन् नक्षलवाद्यांचे थिंक टँक समजले जाणारे वरवरा राव, अरुण परेरा, गौतम नवलखा, वर्णन गोन्सालवीस आणि अधिवक्ता सुधा भारद्वाज यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर डावे, काँग्रेसवाले, तथाकथित विचारवंत आणि स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवणारे अनेकांनी निषेध केला. देशभरात ठिकठिकाणी आंदोलने केली, पत्रकार परिषदा घेतल्या. इतकेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, त्यांना अटकेपासून वाचवून नजरकैदेत ठेवण्याचा आदेश मिळवला. काही राजकीय नेत्यांनीही नजरकैदेत असलेल्या या नक्षलवाद्यांच्या घरी जाऊन भेटही घेतली.या सर्वांवरही देशद्रोही नक्षलवाद्यांचे समर्थन केल्याबद्दल कडक कारवाई करणारा कायदा बनवावा अन् शहरी नक्षलवादासह देशभरात रुजलेला नक्षलवाद संपवण्यास सैन्य आणि पोलीस यांना सर्वाधिकार द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.