चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड (रेल्वे) येथे एकाच दोरीच्या सहाय्याने आई व मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

0
3685

मुलगा मुंबई येथे विद्युत मंडळात होता कार्यरत

 

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान ) 

     शेतकऱ्यांचा महत्वाचा सण असणाऱ्या पोळ्याच्या पुर्वसंध्येला चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड (रेल्वे) येथे माय – लेकाने एकाच दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची ह्रदय हेलावुन टाकणारी दुख:द घटना शनिवारी (ता. ८) सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली. मन सुन्न करून टाकणाऱ्या या घटनेमुळे अख्ख्या गावात शोककळा पसरली आहे.

    चांदूर रेल्वे वरून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मालखेड (रेल्वे) येथील रूपेश बाळकृष्ण फुसे (वय ३२) हा युवक मुंबई येथे विद्युत मंडळात कार्यरत आहे. रूपेशचे मोठेबाबा चंपतराव फुसे यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे तो मुंबईवरून मालखेड गावी आला होता. परंतु शनिवारी ४.३० वाजताच्या दरम्यान रूपेश फुसे व त्याची आई शशिकला बाळकृष्ण फुसे (वय ७०) यांनी एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन राहत्या घरीच आत्महत्या केली. रूपेशच्या चुलत भावाचे मुलं शौचालयाकरीता रूपेशच्या घरी आले असता त्यांना दोघांचेही मृहदेह लटकलेले दिसले. या घटनेची माहिती ज्ञानेश्वर फुसे यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला दिली. यानंतर घटनास्थळी चांदूर रेल्वेचे पोलीस, मालखेड रेल्वे येथील पोलीस पाटील मेघा मावरे पोहचले होते. घटनेची माहिती सगळीकडे माहित होताच नागरीकांनी एकच गर्दी केली होती. पोलीसांनी ७.३० वाजताच्या जवळपास मृतदेह खाली उतरविला व त्यानंतर ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला होता. दोघांच्याही आत्महत्येचे कारण कळू शकले नसुन पोलीसांनी आकस्मीत मृत्युची नोंद केल्याचे समजते. रूपेशला एक विवाहीत बहिण सुध्दा आहे. त्याच्याजवळ फक्त अर्धा एकर शेती असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

४ वर्षापुर्वी लागला होता विद्युत मंडळात

गावातील नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातीला रूपेशच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. परंतु जवळपास ४-५ वर्षा अगोदर रूपेश मुंबई येथे विद्युत मंडळात नोकरीवर लागला होता. त्यामुळे घरची परिस्थिती सुधरली होती. रूपेश पत्नी, मुलासह मुंबईला स्थायी झाला होता व आई मालखेड येथील घरी राहत होती.

रूपेशला दोन वर्षाचा आहे मुलगा

मृतक रूपेश विवाहीत असुन त्याला अंदाजे दोन वर्षांचा मुलगा सुध्दा आहे. रूपेशच्या अशा अचानक मृत्युमुळे त्या मुलावरचे पितृछत्र हरविले आहे.