उस्मानाबाद जिल्ह्यात राशन तस्करांचा धुमाकूळ

0
1030

लतीफ मामा शेख नळदुर्ग

उस्मानाबाद – नळदुर्ग शहर व परीसरातील अनेक गावात पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या जाणीव पुर्वक र्दुलक्षपणा मुळे तसेच खाकी व खादीच्या आर्शिवादाने गहु माफियांचा धुमाकूळ सुरु असुन सर्वांनच्या तेरी भी चुप मेरी भी चुप मुळे रेशनवर मिळणाऱ्या गहू व तांदूळाचा काळाबाजार तेजीत सुरू आहे.मुंबई-हैदराबाद या महामार्गा वरुन अवैध साठा करुन ठेवलेले गहू-तांदूळाचे पिशव्या वहाना मध्ये भरुन इतर राज्यात पाठविले जात आहेत.मात्र गहू व तांदूळाचे काळाबाजार करणाऱ्या विरोधात प्रशासन कसल्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरील नळदुर्ग शहर व परीसरात गेल्या काही महिन्या पासुन गहू माफियांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. या गहू माफियाना कायदे चा धाक नसल्याने ते इतके माजले आहेत की चक्क रस्त्यावर वाहने लावून साठा करुन ठेवलेले रेशनिंगचे गहू- तांदूळ पिशव्या बदलतात हि परिस्थिती केवढ नळदुर्ग ची नाही तर परीसरातील चिवरीपाटी,मुर्टापाटी,काटगाव व मानमोडी शिवारासह इतर गावाची आहे.शासनाने रेशनिंग मध्ये होणाऱ्या काळाबाजार संपविण्यासाठी बायोमेट्रिक मशीन रेशनिंग दुकानदाराला दिली.मात्र गहू-तांदूळाचा काळाबाजार करण्यात पटाईत असलेले काही रेशनिंग दुकानदार रेशनकार्ड धारकाकडुनच गहू- तांदूळ खरेदीचा व्यवसाय सुरु करून जमा झालेला माल व गोडाऊन मधून आलेल्या गहू- तांदूळाची विल्हेवाट लावून मोकळे होत असल्याचे दिसून येतात. त्याच बरोबर गोडाऊन मध्ये मोजमापसाठी असलेल्या वजन काटेचा गोडाऊन किपर पुरेपूर फायदा उचलत असल्याचे दिसतो कारण गोडाऊन मध्ये रेशनिंग दुकानदारांना वाटप करण्यात येणाऱ्या पिशव्याचे फक्त वजन केले जात नाहीतर चक्क पिशवीतुन धान्य काढत असल्याचे दिसुन येतो.अशी तक्रार अनेक दुकानदारांची आहे. प्रत्येक पिशवी काढण्यात आलेले माल कुठे जातो हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे गहू व तांदूळाचे काळाबाजार करणारे गोडाऊन परीसरात ठांण मारुन बसलेले दिसतात.हा सर्व प्रकार तहसील कार्यालयातील पुरवठा खात्याचे काही अधिकारी व पोलीस खात्याच्या काही लोकांना माहीत आहे. परंतु मलीदा मिळत असल्याने तेरी भी चुप मेरी भी चुप म्हणून जाणीवपूर्वक र्दुलक्ष करीत आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासर्व काळया धंद्यात जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील काही भैय्या, अण्णा,मामा, काका, भाऊ सारख्या राजकरण्याची भुमिका सक्रीय दिसते.एखाद्या वेळेस गहूचा काळाबाजार करणाऱ्याची पोलिसांनी वहान अडविलेअथवा गुप्त माहिती वरुन छापा मारला तर गुन्हा दाखल करु नये यासाठी सर्व प्रथम अधिकाऱ्यांना पहिला फोन येतो राजकीय पुढारी चा व तडजोड करुन मिटवा अन्यथा बदली करण्याची धमकी देतात वस्तूस्तीथी आहे.तसेच काळे धंद्याची तक्रार देणाऱ्यांना व घटनास्थळी हजर असणाऱ्याला खंडणी चा गुन्हा दाखल करु म्हणून धमकावले जाते हे देखील सत्य आहे.त्यामुळे अनेक वेळा छापा मारुन सुध्दा माल मिळत नाही. त्यामुळे असल्या काळे धंदे करणाऱ्या माज चढलेल्या हरामखोरांना प्रोत्साहन मिळत आहे .या गहू- तांदूळच्या काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभाग व पोलिस प्रशासनाने धडक मोहीम उघडून कारवाई करावी अशी मागणी जनतेतुन केली जात आहे.लतीफ मामा शेख नळदुर्ग