आकोट जेसीरेट विंगचा विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

520

आकोट / संतोष विणके – जेसीय आकोट जेसीरेट विंग द्वारा राष्ट्रीय कार्यक्रम किरण अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय वडाळी देशमुख येथे झोन ट्रेनर जेपी नितीन झाडे यांनी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी करिअर कसे निवडावे आपल्या छंदाला व्यावसायिक स्वरूप दिले तर जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो यासारख्या अनेक विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेझोन ट्रेनर जेसी प्रशांत खोडके यांनी व्यक्तिमत्व विकास या महत्त्वपूर्ण विषयावर आपल्या ओघवत्या शैलीमध्ये मुलांना हसत खेळत व्यक्तिमत्त्वाचे धडे दिले आणि आपण कसे या जगाचा एक महत्त्वपूर्ण अनमोल घटक आहोत हे त्यांच्या मनावर बिंबवले याचबरोबर जेसीरेट राजश्री बाळे यांनी मुलांचे आरोग्य व त्यांची स्वच्छता याबाबत विद्यार्थ्यांना जागृत केल

आस्कि पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू सुजय कल्पेकर यांनी प्रात्यक्षिक दाखवले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मूलभूत मानवाधिकार याबद्दल माहिती श्री देवानंद झाडे यांनी दिली याप्रसंगी जेसीरेट विंग अध्यक्ष वंदना गोगटे यांच्या नेतृत्वात प्रकल्पप्रमुख जेसीरेट सपना राठी,जेसीरेट आशा हीरोळकर ,जेसीरेट मंगला गणोरकर यांनी यशस्वी आयोजन केले अध्याय प्रथम महिला अरुणा खोडके यांचे प्रोत्साहन प्रेरणादायी ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष जेसीरेट वंदना झाडे जेसीरेट स्वाती वासे,जेसीरेट ममता टावरी,जेसीरेट पल्लवी गणगणे जेसीरेट वर्षा ठाकूर जेसी अमर राठी,जेसी राजेश गोगटे,यांची विशेष उपस्थिती लाभली आणि या कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपनाने करण्यात आली.