उस्मानाबाद – येडशीच्या शेतकर्यांनी ट्रँक्टर मिरणुक करून केला बैलपोळा सण साजरा

447

हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद मो-9623261000

उस्मानाबाद – तालूक्यातील येडशी येथे बैल पोळा म्हणून गावातील शेतकरयांनी आधुनिक पध्दतीच्या यांत्रिक शेती म्हणून ट्रॅक्टरची मिरवणूक रविवार (ता.9) रोजी सकाळी दहा वाजता येडशी येथील जनता विद्यालयासमोरून वाजत गाजत काढण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बैलाचा सांभाळ करणे शक्य नसल्याने व शेतातील सर्व मशागतीची कामे लवकर व्हावीत म्हणून गावातील 45 शेतकरयांनी ट्रॅक्टर घेऊन स्वतःच्या शेतातील व इतरांच्या शेतातील नांगरणी, मोगडणी, पेरणी, फवारणी, मळणी यासह विविध कामे वर्षभर करतात. पूर्वी गावात 250 ते 300 बैल जोड्या होत्या. सध्या 50 च्या आसपास बैल जोड्या राहिल्या आहेत. अनेक शेतकरयांनी बैल विकून ट्रॅक्टर खरेदी केले. त्या ट्रॅक्टर पोळा म्हणून आज गावातून मिरवणूक काढण्यात आली. ट्रॅक्टरला सजवलेले तसेच झुली टाकून, ढाल बांधून तसेच कांही शेतकरयांनी ट्रॅक्टरवर मातीचे बैल जोड्या तयार करून लावले होते. या ट्रॅक्टर पोळ्याचे हे पहिले वर्ष असून या ट्रॅक्टर मालकांचा एक बचत गट ही स्थापन करण्यात आला आहे.यामुळे आधुनिक काळात यांत्रिक शेती म्हणून ट्रॅक्टरची मिरवणूक धनश्री मुकुंद सस्ते व मधुमती सस्ते यांच्या हस्ते पुजन जाणता राजा चौकात करून संपूर्ण गावातून काढण्यात आली.या मिरवणुकिवरून सध्याचा शेतकरी हा पशुपालक धसून यंत्रपालक आसल्याचे चित्र पहावयास मिळाले यावेळी मुकुंद सस्ते, गजानन नलावडे, उमेश जाधव, सोमनाथ पवार, आप्पासाहेब गोरे, रोहन सोलवट, बाळासाहेब खोबरे, शंकर सायगुंडे, पांडुरंग धायगुडे, अभय लवटे, श्री पवार, गणेश राऊत, श्री भोसले यांच्यासह अनेक ट्रॅक्टर चालक, मालक यांनी मिरवणूक पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले………..

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।