आकोट रोटरी क्लबच्या वतीने वृक्षारोपण व शहानुर येथे कपडे वाटप

0
1197

अकोट/ संतोष विणके – शहरात समाजसेवे मध्‍ये नेहमी अगेसर असलेल्‍या अकोट रोटरी क्‍लब ऑफ अकोटच्‍या वतीने डिस्‍ट्रीक गव्‍हर्नर राजु शर्मा तथा साहायक डिस्‍ट्रीक गव्‍हर्नर दिपक गोयनका यांची भेट आयोजीत करण्‍यात आलेली होती त्‍यानिमित्‍यांने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आलेले होते.
त्‍याअंतर्गत सर्वप्रथम पाहुण्‍यांचे भव्‍य स्‍वागत पुजा टायर्स येथे करण्‍यात आले. त्‍यानंतर पाहुण्‍यांनी तथा रोटरी क्‍लबच्‍या सर्व सदस्‍यांनी सर्व प्रथम अकोला रोड स्‍थीत विठठुमाऊली नगर येथे त्‍यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करुन तथा झाडांना ट्री गार्ड लावुन त्‍या झाडांची संगोपन व निगा राखण्‍याचा सदस्‍याची संकल्‍प केला.
त्‍यानंतर शाहनुर येथे जाऊन तेथील सरपंच्‍याच्‍या मार्गदर्शना खाली गरजु मुलांना कपडे वाटप करण्‍यात आला . नविन कपडे मिळाल्‍यानंतर मुलांच्‍या व गावकरी मंडळीच्‍या चेहरावर आनंद दिसुन येत होता. हया कार्यक्रमासाठी अशोक रेडीमेड तथा विकास रेडीमेडने कपडे उपलब्‍ध करुन दिल

े. हया कार्यक्रमा मध्‍ये जवळपास 200 च्‍या वर शालेय मुला मुलींना कपडे वाटप करण्‍यात आले . राजु शर्मा यांनी शाहनुर येथील लोकांची परिस्‍थीती पाहुन तथा निवडलेले प्रकल्प पाहुण संदस्‍यांच्‍या कार्याची स्‍तुती केली.
तसेच हया भेटी अंतर्गत अकोट रोटरी नेत्र रुग्‍णालय कश्‍या पदधतीने पुर्ण पणे विकसीत होईल व ते होण्‍याकरता लागणारा निधी कसा उपलब्‍ध केला जाईल हया बददल सवीस्‍तर माहीती व माग्रदर्शन प्रमुख अतिथींनी सर्व सदस्‍यांना केले.
हया वेळेस मंचावर रोटरी क्‍लबचे अध्‍यक्ष अरविंद गणोरकार सचिव नंदकिशोर शेगोकार रोटरि चारिट्रेबल ट्रस्‍ट चे अध्‍यक्ष्‍ प्रभाकररावजी मानकर सचिव राजीव गांधि व रविभाऊ मुंडगांवकर उपस्‍थीत होते. कार्यक्रमाचे संचालन शाम शर्मा सर आभार प्रदर्षण संतोष इस्‍ताफे यांनी केले.
कार्यक्रमाचया यशस्वीते करता सुरेश भाई सेदाणी, प्रमोद लाहाने, उध्दवराव गणगणे, शाम पिंपळे इत्यादींनी परिश्रम घेतले . अशी माहीती प्रसिदधी प्रमुख शिरिष् पोटे कळवितात.