स्लग:- येवल्यात बैलपोळा सण साजरा…. ……शेतकऱ्याने बैलांवर रेखाटले अनोखे संदेश……

0
691

प्रतिनिधी/येवला- संतोष बटाव

येवल्यात पोळा हा सण साजरा करताना तालुक्यातील सायगाव येथील ज्ञानेश्वर भालेराव व बबन पुंड या शेतकऱ्यानी आपल्या बैलांवर अनोखे संदेश रेखाटून बैलांना सजवले .त्यात
कांद्याला भाव वाढवा पेट्रोल दर नाही,..रोजगार वाढवा डिझेल दर नाही, …टोमॅटो भाव वाढवा इंधन दर नाही….
शेतकऱ्यांकडे लक्ष द्या आत्महत्या थांबवा…असे विविध संदेश रेखाटून पोळा सणानिमित्त बैलांना सजावण्यात येऊन त्या संदेशाद्वारे बळीराजाने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला .सुहासिनींनी बैलजोडीचे पूजन करून पुरणपोळीचा नैवैद्य दाखवून बैलपोळा सण साजरा करण्यात आला.

प्रतिनिधी/येवला- संतोष बटाव
मो. 9850576769