येवला तालुक्यातील आंबेगाव सह परिसरात पोळ्याचा सन मोठ्या उत्साहात साजरा

0
1018
Google search engine
Google search engine

नाशिक (उत्तम गिते)

येवला तालुक्यातील आंबेगावला पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे.आंबेगाव व परिसरात शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता.शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा पोळ्याचा दिवस मानाचा असतो.

शेतीच्या मशागतीसाठी अनेक गावांमध्ये बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली असली, तरीही शेतकऱ्यांनी हौसेखातर का होईना बैल आपल्या घरी ठेवलेले आहेत. त्या बैलांची पोळ्यानिमित्त मिरवणूक काढून त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. आंबेगाव व परिसरात बागायती शेती असली,तरीही बैल जोडी अजूनही शेतकऱ्यांकडे आहे,त्यामुळे आंबेगाव येथे बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी शेतकऱ्यांनी आपल्या या सर्जा-राजाला सजवण्यासाठी बाजारातून अनेक वस्तू, रंग, खरेदी केले आहेत..

पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घातली जाते. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावले जाते. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधले जातात. अशा नाना तर्‍हेने सजविण्यात आलेल्या. शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढल्या जातात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार केली जाते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्‍नीक वाजत गाजत जातात व त्याला ‘अतिथी देवोभवो’ प्रमाणे घरी आणले . घरातील सुहासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दिले . त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान केले जाते. या रोजी गावातील इतर घरातून ही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले . शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्यात्यांचे पाठीवर सुरेख नक्षिकाम केलेली झुल लावण्यात आली

आंबेगाव,वेळापूर, वाकी, सोमठाणदेश,पाटोदा या भागात पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी सुद्धा गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली गेली.अशा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपारिक पोळा साजरा केला गेला.

छायाचित्र :- उत्तम गिते आंबेगाव