चांदुर बाजार पोलिसांच्या प्रो रेड अंतर्गत कार्यवाही सुरू.एकूण 13 रेड तर 11आरोपी अटक,दोन आरोपी फरार

0
902
Google search engine
Google search engine

👉🏻चांदुर बाजार पोलिसांच्या प्रो रेड अंतर्गत कार्यवाही सुरू.एकूण 13 रेड तर 11आरोपी अटक,दोन आरोपी फरार
चांदुर बाजार बादल डकरे:-
चांदुर बाजार तालुक्यात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात गावठी तसेच देशी दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता.कर्तव्य दक्ष ठाणेदार अजय आकरे यावर कधी आपला शिकजा घेणार अशी चर्चा सुद्धा चर्चेचा विषय ठरत होते.तिकडे पोलीस विभाग बद्दल नागरिकांच्या मनात संशय ची भूमिका तयार होत होती तर अजय आकरे याच्या अवैध वाल्यावर कार्यवाही करून आपले तेच रूप जे चांदुर बाजार,आसेगाव,ब्राम्हणवाडा थडी तसेच परतवाडा या ठिकाणी अवैध धंदे वाल्यानी पाहिले होते.मात्र या सर्व चर्चेत वर लवकरच विराम लागणार असल्याचे दिसत आहे.ठाणेदार अजय आकरे यांनी मागील दोन दिवसांपासून पोलिस स्टेशन हद्दीमधील अनेक गावांत रेड केली आणि गावठी दारू देशी दारू मोठया प्रमाणावर जप्त केली.यामध्ये त्यांनी 11 आरोपी याना दोन दिवसात अटक केली तर 2 आरोपी हे फरार आहे.त्याचा शोध चांदुर बाजार पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे,पोलिस उपनिरीक्षक सचिन चौधरी पोलिस कॉस्टबल पंकज फाटे घेत आहे. झालेल्या प्रो रेड मध्ये चांदुर बाजार पोलिसांनी बोराळा, शिरजगाव बंड,हिरुळपूर्ण,काजळी,पिपरी पूर्णा, कोडवर्धा या गावात अवैध धंदे वाले तसेच गावठी आणि देशी दारू विक्री करणाऱ्या वर कार्यवाही केली. यामध्ये चांदुर बाजार पोलिसांनी.आरोपी अशोक माणिकराव सुलताने वय 60 वर्ष रा.हिरूळपूर्ण,मोहन संजय कुरवाले वय 27 वर्ष रा.हिरुळपूर्ण,मीना बाळू इंदोरे रा.हिरूळपूर्ण, सुनिक नीलकंठ चव्हाण रा.बोराला,सुधीर रंगराव कोकणे रा.शिरजगाव बंड.,रामधन गोविंदराव कुरवाले,रा.पिपरी पूर्णा,सुरेश शेषराव अवसरमोल रा.काजळी,अंकुश पंजाब राव परिसे,रा कुरळपूर्णा ,मुकेश मुगिलाल,वानखडे रा काजळी यांना अटक केली तर अनिस उर्फ अन्नू सौदागर रा.चाळीसगाव,आशिष जयकृष्ण इंगळे रा.कोडवर्धा हे फरार आहे याचा शोध शरद भस्मे पोलीस उपनिरीक्षक आणि पंकज फाटे पोलीस कॉस्टबल याची टीम करीत आहे. वरील सर्व आरोपी वर मुबंई दारू बंदी कायदा 65 (ड)अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.सदर कार्यवाही ठाणेदार अजय आकरे याच्या मार्गदर्शन खाली पोलिस उपनिरीक्षक शरद भस्मे, पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी ,पंकज फाटे आणि चांदुर बाजार पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यानी केली.