👉🏻चांदुर बाजार पोलीस स्टेशन येथे शांतता सभा 👉🏻पोलीस पाटील आणि पत्रकार यांची उपस्थिती

0
1115
Google search engine
Google search engine

👉🏻चांदुर बाजार पोलीस स्टेशन येथे शांतता सभा
👉🏻पोलीस पाटील आणि पत्रकार यांची उपस्थिती

चांदुर बाजार:-

👉🏻पोलीस पाटील हे गाव पातळीवर महत्वाचे पद आहे.गावातील कोतवाल, तलाठी,शिक्षक,ग्रामपंचायत यावर त्याचे लक्ष्य असणे गरजेचे आहे तसेच गावातील गुन्हेगार प्रवृत्ती असणाऱ्या नियंत्रण ठेवून गावातील तंटे गावात मिटवण्यासाठी पोलीस पाटील मुख्य भूमिका पार पाडत असतो.असे वक्तव्य काल सायंकाळी 5 वाजच्या सुमारास अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अबदगिरे यांनी केले.ते पोलीस पाटील आणि पत्रकार याचा शांतता समिती च्या सभेच्या वेळी बोलत होते.

येणारे सण उत्सव लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था ठिकून राहावी. तसेच कायदाला आवश्यक असणाऱ्या या सर्व गोष्टी तसेच स्थनिक पातळीवरील समस्या जाणून त्याचे निराकरण करण्यासाठी दिनांक 8 सप्टेंबर 2028 सायंकाळी 5 वाजता च्या सुमारास शांतता समिती सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीत येणारे सर्व गावातील पोलीस पाटील,ठाणेदार अजय आकरे,पत्रकार सुमित हरकूट, राजाभाऊ देशमुख, किशोर मेटे,बादल डकरे,मजीद इकबाल दिलीप ठाकूर उपस्थित होते.

तसेच चांदुर बाजार पोलीस स्टेशन ला कर्तव्यदक्ष ठाणेदार अजय आकरे लाभले आहे.त्याच्या फायदा गावपातळीवर शांतता कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी सर्वानी घेतला पाहिजे.तसेच सर्व स्तरावरून त्यांना सहकार्य सुद्धा करावे असे वक्तव्य अचलपूर पोलिस उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे यांनी शांतता समिती च्या सभेच्या वेळी केले.