सावंगा (बु.) येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा – संदिप सोळंके यांचा पुढाकार – आसिम खान याला प्रथम पुरस्कार

0
977

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान .) 

    चांदूर रेल्वे लगत असलेल्या सावंगा (बु.) येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा स्व. पुंडलीकराव सोळ्के यांच्या स्मृती प्रित्यर्थ भाजपा सरचिटणीस यंदिप सोळंके यांच्या पुढाकाराने सोमवारी भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आसिम खान हाफीज खान या चिमुकल्याच्या नंदीबैलाला प्रथम क्रमांक देण्यात आला.

      सावंगा (बु.) येथील ज्योतिबा फुले चौकात आयोजित तान्हा पोळ्याच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी अॅड. राजीव अंबापुरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन उत्तमराव ठाकरे, माजी सरपंच ज्ञानेश्वर सोळ्के, सुनिल सोळंके, सतिष सोळंके, श्री. मलवार, श्री. टाले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या तान्हा पोळ्यामध्ये गावातील चिमुकल्यांनी विविध प्रकारे सुंदर असे नंदिबैल सजवुन आणले होते. यांतील आसिम खान हाफीज खान याच्या तान्हा बैलाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या कार्यक्रमाचे बक्षिस वितरण अॅड. राजीव अंबापुरे व उत्तमराव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले.

       कार्यक्रमाचे संचलन तान्हा पोळ्याचे आयोजक संदिप सोळंके यांनी केले. यावेळी अक्षय कठाडे, गजानन डुबे, वैभव गिलबिले, बंडुभाऊ मेटकर, विलास इरतकार, प्रदिप सोळंके, मंगेश धामणकर, अशोक सोळंके यांच्यासह गावातील नागरीक, महिला, युवक-युवतींची उपस्थिती होती.

मातीने तयार केला नंदिबैल

या तान्हा पोळ्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आसिम खान हाफिज खान याने बाहेरील तयार नंदिबैल विकत न आणता घरीच मातीचा नंदिबैल तयार केला व त्याचीच सजावट करून या तान्हा पोळ्यात आणला होता. यामुळेच हा नंदिबैल सर्वांपेक्षा आकर्षित दिसत होता. यामुळेच या नंदिबैलाला प्रथम क्रमांक मिळाल्याचे समजते.