उस्मानाबाद- कळंब शहरात विवाहेतेची गळफास घेऊन आत्महत्या , सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
827

कळंब शहरात खळबळ विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

उस्मानाबाद – उस्मानाबाद- जिल्ह्यातील कळंब शहरांमधील गांधीनगर भागांमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत कळंब पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कळंब शहरांमधील गांधीनगर येथे मनोरमा संतोष सोनवणे यांनी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले सदर घटनेची माहिती कळंब पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला दरम्यान मयत महिलेच्या वडिलांनी सासरच्या सहा जणांविरुद्ध मानसीक ,व शारीरीक छळ केल्या प्रकरणी कळंब शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे यात मयत महिलेचा पती सासू व नंदांचा समावेश आहे घटनास्थळाला कळंब पोलिस विभागाचे उपविभागीय अधिकारी डाँ नितीन कटेकर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरगीड्डे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती समजली आसून पूढिल तपास कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत