उस्मानाबाद- कसबे तडवळ्यात २७० शिक्षकांचा सन्मान

0
1323
Google search engine
Google search engine

विकास उबाळे क तडवळे प्रतिनिधी

उस्मानाबाद-तालुक्यातील कसबे तडवळा येथे कै.कलावती सदाशिव कोरे यांच्या स्मरणार्थ उस्मानाबाद तालुक्यातील 270 शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर पाटिल तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षण विस्तार अधिकारी सौ किशोरी ताई जोशी ,म.रा.शिक्षण संघटनेचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण तांबारे, तेली समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवि कोरे आळणीकर,भाजपा जिल्हासरचिटणीस सतिश देशमुख,प्रा.सरदार गव्हाणे बार्शी ,नितीन तावडे,शेतकरी महाराष्ट्र शेतमजुर लातुर संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटिल आदि मान्यवरांच्या उपस्थितीत जय हिंद विद्यालय कसबे तडवळा या सभागृहात कोरे कुटुंबीयांच्या वतीने “गुरूभक्ती” हे पुस्तक व सन्मान पञ देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद तालुक्यातील येडशी,उपळा,सारोळा,चिलवडी,कनगरा,बावी,रूईभर,तडवळा,तेरणा नगर,अंबेजवळगा,तेर,केशेगाव,समुद्रवाणी,आदि केंद्रातील व तडवळा गावातील कळंब तालुक्यातील शिक्षकांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. मनोगतात कोंडाप्पा कोरे म्हणाले की,विद्यार्थांचा अज्ञानाचा अंधकार नष्ठ करतो तो महात्मा म्हणजे शिक्षक सुर्य प्रकाशा पेक्षा ज्ञानदानाचा प्रकाश सर्वश्रेष्ठ आहे. शिक्षक हा परमात्मा आहे.तर शिक्षण विस्तार अधिकारी सौ किशोरी ताई जोशी यांनी कोंडाप्पा कोरे यांनी घेतलेल्या कार्यक्रम बद्दल त्यांचे कौतुक केले सगळे शिक्षकाचे पुरस्कार हे येवढ्या मोठ्याप्रमाणत घेणारे हे कोरे कुटुंबीयच आहे.तर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी शिक्षकांचा हा कौतुक सोहळा घेतल्याबद्दल कोरे कुटुंबीयचे अभिनंदन केले व शिक्षकांनी जि प शाळेचा गुणवत्ता स्तर वाढविण्यासाठी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले तसेच अध्यक्षीय भाषणात सुधीर पाटिल यांनी जि.प. शाळेतील विद्यार्थांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन केले.तसेच या कार्यक्रमात एक खंत व्यक्त केली इंग्लिश शाळेचे वाढलेले प्रस्त पहाता आपल्या दररोज बोलतो ती मराठी भाषेतच अभ्यासक्रम असला पाहिजे तर आपल्या शाळेचा दर्जा सुधारेल यावेळी पाश्चात देशातील उदारण यावेळी उपस्थित शिक्षकांना दिले.या कार्यक्रमासाठी संयोजक प्रमुख श्री कोंडाप्पा कोरे,सौ कमल कोरे, श्री धनाजी कोरे,श्री शिवाजी कोरे,श्री शहाजी कोरे,सौ.शितल कोरे,सौ.शिवकन्या कोरे,सौ मनिषा कोरे व तडवळा गावातील व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते