येवला येथे उघडला लेकीच्या सन्मानाने दरवाजा

0
877

प्रतिनिधी/ संतोष बटाव . येवला

येवला तालुक्यातील जि. प.प्रा शाळा जऊळके येथे अनोखा उपक्रम संपन्न झाला. लेक वाचवा, लेक शिकवा या अभियानांतर्गत “करूया सन्मान लेकीचा ह्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सर्व प्रथम मुख्याध्यापक श्री अंबादास मोरे सर व या उपक्रमाचे प्रणेते महालखेडा शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर पायमोडे सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. फेरीत सहावारी व नऊवारी साडी परीधान केलेल्या मानाचा फेटा बांधलेल्या विद्यार्थीनी सोहळ्याचे नेतृत्व करत होत्या. ढोल ताशा व झांज यांच्या निनादात फेरी सुरू होती. फेरीतील सहभागी विद्यार्थी लेक वाचवा, लेक शिकवा मुलगी शिकली प्रगती झाली, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा देश वाचवा ह्या घोषणा देऊन जनजागृती करत होते. फेरी मार्ग सडा रांगोळी काढुन शुशोभित करण्यात आला होता. सोहळा ज्या लेकीच्या घरासमोर गेला त्या लेकीच्या आईने मुलीचे औक्षण केले तिला पेढा भरवला . शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थीनी च्या नावाची पाटी दरवाजाला लाऊन तिचा सन्मान केला. पालकांना मुलगा मुलगी एक समान आहेत . मुलामुलींन मधे भेद करू नका. असा संदेश देऊन जनजागृती करण्यात आली. मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटवून दिले. तसेच आई वडिलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. माझ्या मुलीचा सन्मान करण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यी माझ्या घरी आले हे बघून पालकांना खूप आनंद झाला. व मुलगी असल्याचा अभिमान त्यांना वाटु लागला. नावाची पाटी व झालेला सन्मान बघून मुलींच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. गावातील 74 मुलींच्या घराचा दरवाजा आता त्यांच्या सन्मानाने उघडला जातोय. हा सावित्रीच्या लेकीचा सन्मान सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. प्रभात फेरी संपल्यावर शाळेत प्रबोधनपर मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मुलाच्या जन्माचे स्वागत जसे पेढे वाटून करतात तसेच स्वागत मुलीच्या जन्माचे झाले तर मुलामुलींन मधील भेद दुर होण्यास मदत होईल. व कोणत्याही घरात नकोशी हे दुषण लाऊन मुलगी जन्माला येणार नाही असे प्रतिपादन यावेळी उपक्रमाचे प्रणेते श्री ज्ञानेश्वर पायमोडे सर यांनी केले. हा स्त्री शिक्षणाचा जागर व स्त्री जन्माचे स्वागत करणारा उपक्रम राबविणारे हे 63 वे विद्यालय आहे असेही पायमोडे सरांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अंबादास मोरे सर श्री जालिंदर सोनवणे सर योगेश जगदाळे सर श्रीमती चौधरी मॅडम श्रीमती संगिता कडलग मॅडम यांनी प्रयत्न केले. सुञसंचलन श्री जालिंदर सोनवणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती सुवर्णा चौधरी मॅडम यांनी मानले.
प्रतिनिधी / संतोष बटाव. येवला मो.9850576769