येवला येथे टोमॅटो वाटले मोफत…… …….मनसेच्या वतीने टोमॅटो मोफत वाटप……

429
जाहिरात

येवला/प्रतिनिधी:- संतोष बटाव

येवल्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने टोमॅटो व कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने टोमॅटो नागरिकांना मोफत वाटप करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. सध्या टोमॅटोला 2 ते अडीच रूपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून टोमॅटोला व कांद्याला भाव द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महेश लासुरे यांच्या नेतृत्वाखाली येवल्यातील आठवडे बाजार असल्याने टोमॅटोचे नागरिकांना मोफत वाटप करण्यात येऊन सरकारचे लक्ष वेधण्यात आले.यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी देत टोमॅटो पिकाला भाव द्या अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.यावेळी मनसेचे शहराध्यक्ष गौरव कांबळे,राहुल जाधव,लखन पाटोळे,महेंद्र जाधव,सागर पवार,गणेश चव्हाण,रामदास लासुरे,शेलेश कर्पे आदी उपस्थित होते.

येवला/प्रतिनिधी:- संतोष बटाव
मो.नं.9850576769

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।