उस्मानाबाद- सहाय्यक पोलिस निरीक्षक गणपत जाधव यांनी चार सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावले

0
1759
Google search engine
Google search engine

विकास उबाळे कसबे तडवळे

ढोकि पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणपत जाधव यांना सुवर्ण पदक बहाल करताना दिसत आहेत

उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्या पोलिसांचे जालना येथे घेण्यात आलेल्या औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात उस्मानाबाद जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद व सात सुवर्ण ,तीन रजत आणि तीन कांस्यपदक पटकावले यामध्ये ढोकी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले ढोकी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणपत जाधव यांनी चार सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावले व त्यांच्या बरोबर जिल्ह्यातील इतर सात कर्मचाऱ्यांना चांगली कामगिरी केली त्यामुळे औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री मुत्याल व उस्मानाबाद पोलीस अधीक्षक श्री आर रामा स्वामी यांच्या हस्ते सर्वांना गौरविण्यात आले

याबाबत सविस्तर वृत्त असे की जालना येथे चार सप्टेंबर ते सात सप्टेंबर या कालावधीत औरंगाबाद ,उस्मानाबाद,बीड,जालना,या जिल्ह्यातील पोलिस अधीकारी व कर्मचारी यांचा कर्तव्य मेळावा घेण्यात आला त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याने सात सुवर्णपदक, तीन रजत ,तीन कांस्यपदक पटकावले असून ढोकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणपत जाधव यांनी आय ओ पोलीस फोटो ग्राफी ,लिफिटिंग ,पॅकिंग ऍण्ड फॉरवरडींग ,फॉरेन्सिक सायन अँड मेडिसिन व फिंगर प्रिंट या विभागात चार सुवर्णपदक तर गुन्हे तपासासाठी एक रोप्य पदक पटकावले ,तसेच एस एस घुगे यांनी एक सुवर्णपदक व एक कांस्यपदक, नितीन तुपे रोप्य,अमोल निंबाळकर सुवर्णपदक, ए जी पोतदार एक सुवर्णपदक व कांस्यपदक, हुमायून शेख रोपयपदक, एस व्ही दसवंत एक कांस्यपदक, तसेच डॉग स्कॉडमधील एस पी मुंडे आणी व्ही एस ढवण याना प्रत्येकी एक कांस्यपदकाने गौरवविण्यात आले

सन्मान कर्तव्य दक्ष जाँबाज अधिकारी ढोकि पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री गणपत जाधव

या सर्वांचे पोलीस महानिरीक्षक श्री मुत्याल ,पोलीस अधीक्षक श्री आर रामा स्वोमी ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर ,यांच्या उपस्थितीत गुणगौरव करून पदकांचे वाटप करण्यात आले यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस अधीकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते (उस्मानाबाद जिल्ह्या पोलिसांनी सात सुवर्णपदक, तीन रजत ,व तीन कांस्यपदक मिळवल्याने उस्मानाबाद पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे)