उस्मानाबाद- सह्याद्री फाऊंडेशनच्या मदतीला धावणार उस्मानाबाद चे पोलीस

0
912

उस्मानाबाद- समाजाच्या मदतीसाठी पोलीस विभाग, सह्याद्री फाऊंडेशन्स व चाईल्ड-लाईन उस्मानाबाद, यांच्या हाकेला प्रतिसाद देणार

– पोलीस उपविभागीय अधिकारी मोतीचंद राठोड

अल्लामा सिद्दीक उर्दू हायस्कूल,क्रिसेंट इग्लिश स्कूल व हया उलउलुम अरबी शाळा उस्मानाबाद या शाळेतील आदर्श शिक्षकांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व त्यांचा सत्कार व चाईल्ड-लाईन या संस्थेची 1098या टोल फ्री नंबरची जनजाग्रती 800 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मैनुद्दीन पठाण तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीसअधिकारी श्री.मोतीचंद राठोड उपस्थित होते.मार्गदर्शनपर भाषण करताना सह्याद्री फाऊंडेशन्सचे संस्थापक-अध्यक्ष डाँ. दापके-देशमुख दिग्गज यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात चाईल्डलाईन संस्थेमुळे कोणीही अनाथ व निराधार राहणार नाही,अशी ग्वाही दिली.प्रास्ताविक मानव अधिकार उस्मानाबाद शहर अध्यक्ष बिलाल रजवी यांनी केले व सुत्रसंचालन पठाण सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी सह्याद्री फाउंडेशन्स च्या सचिव व स्त्री रोग तज्ञ डॉ.वसुधा दापके-देशमुख,जिल्हा बाल सौरक्षण अधिकारी अमोल कोवे,जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष ए. डी. कदम, जिल्हा बाल समिती सदस्य एन. ए. कोळगे व श्रीमती. के.एम. कारभारी,अंजुमन हेल्थकेअर, वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष फिरोज पल्ला,अल्लामा एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मुफ्ती रहेमतुल्ला खान, प्रिंसीपल एजाज अली, क्रिसेंट इग्लिश स्कुलचे संस्थापक सय्यद मदिहा मुजाहीद हुसेन, प्रिंसीपल सय्यद अंजुम,डॉ. मोहसीन खान,इफ्तेकार पटेल, सह्याद्री चे गजानन पाटील, चाईल्ड-लाईन चे समन्वयक अनिल जाधव,टिम मेंबर दादासाहेब कोरके संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.