उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यावर पुन्हा दुष्काळाचे सावट

0
1131
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या कचाट्यात सापडला आहे गेल्या दहा वर्षापासून उस्मानाबाद जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट ओडावले आहे उस्मानाबाद जिल्हा अतिमागास जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर असून यंदाही पावसाने पाठ फिरवल्यामुळे पुन्हा हा जिल्हा वरच्या क्रमांकावर येतो की काय अशी धास्ती लागली आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये सध्या हंगामी पेरणी केलेली आहे शेतात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केलेली आहे यासोबतच इतर पिकांची पेरणी केलेली असून पावसाळा संपत आला तरीही उस्मानाबाद जिल्ह्यातील नदी नाले कोरडे पडलेले आहेत काही भागात थोडाफार पाऊस पडल्यामुळे तेथील पिकांना जीवदान मिळाले होते परंतु पावसाळा संपत आला अद्यापही पाऊस न पडल्यामुळे ते पिके वाया गेले आहेत त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या कचाट्यात सापडला आहे या पिकाच्या होत असलेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून होत आहे