आकाशवाणी केंद्रात करंट लागून एक ठार , दोन जखमी

0
3889
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद- उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रात वीज दुरुस्ती आणि साफसफाई करणाऱ्या तीन कामगारांना विजेचा शॉक लागला यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहेउस्मानाबाद आकाशवाणी केंद्रात आज सकाळपासूनच वीज दुरुस्ती आणि सासफाईच काम तीन कामगार करत होते यावेळी अल्युमिनियमची शिडी एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जात असताना शिडी 11 केव्हीच्या तारेला चिटकली त्यामुळे ही शिडी घेऊन जाणारे शाम भोसले,अनिल पवार आणि विजय सरपळे यांना या उच्च दाबाच्या विजेचा शॉक लागला शॉक लागल्याचा आवाज मोठा झाल्याने आकाशवाणी कार्यालयातील कर्मचारी घाबरून बाहेर पळत आले तेंव्हा हे तिघे ही जखमी झाल्याचे दिसले तेंव्हा त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यातआले त्यावेळी डॉक्टरांनी शाम भोसले यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.तर अनिल पवार आणि विजय सरपळे हे गंभीर असल्याचे सांगीतलेयावेळी केंद्र प्रमुख संजय बिरीदे आणि आकाशवाणीचे अधिकारी कर्मचारी जिल्हा रुग्णालयात हजर होते.