उस्मानाबाद- नळदुर्ग पोलिसांनी सहा लाखाचा गुटखा पकडला

0
940
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिसांची गुटख्याच्या अड्ड्यावर धाड सहा लाखाचा गुटखा जप्त केला आहे .

तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा याठिकाणी राहत्या घरामध्ये हैदर इलाई पठाण यांच्या घरामध्ये सहा लाखांच्या गुप्त माहिती मिळताच नळदुर्ग पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजीवनी मिरकले व उप पोलीस निरीक्षक विठ्ठल वारे व त्यांचे सहकारी पोलिसांनी धाड मारून गुटखा जप्त करण्यात आला आहे.

अन्न प्रशासन अधिकारी सध्या तालुक्यांमध्ये एकही ठिकाणी कारवाई न केल्याने सध्या तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे गुटका खुलेआम विकत आहे प्रत्येक गावात पानटपर्‍यांवर धाब्यावर खुलेआम विक्री होत आहे .याकडे अन्न प्रशासन अधिकारी उस्मानाबाद जिल्ह्यात झोपेचं सोंग घेतलेल्या दिसून येत आहे अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे