👉🏻तळेगाव मोहना येथे सरपंच ग्रामविकास अधिकारी यांचा मनमाणीपणा मुळे गावाचा विकास खुंटला

0
1527
Google search engine
Google search engine

 

*👉🏻तळेगाव मोहना येथे सरपंच ग्रामविकास अधिकारी यांचा मनमाणीपणा मुळे गावाचा विकास खुंटला
दोषींवर चौकशी करून कार्यवाही करण्याची गावकरी ची मागणी.

चांदुर बाजार:-बादल डकरे

चांदुर बाजार तालुक्यातील पंचायत समिती कार्यक्षेत्र मध्ये येणाऱ्या तळेगाव मोहना ग्रामपंचायत मध्ये आठ-अ च्या मोठ्याप्रमाणावर खोटतोड करण्यात आली आहे.तसेच सरपंच सुरेश आकोलकर आणि ग्रामविकास अधिकारी अजय देशमुख हे सगमताने करीत आहे शासनाच्या निधीला भ्रष्ट्राचार केला असल्याचा :-अब्दुल राजीक शेळ हरून यांनी केला तर 4 वर्षात गावामध्ये कोणत्याच प्रकारच्या विकास झाले नसल्याचे गावकरी यांचे मत आहे.त्यामुळे हजारो रुपये वेतन तरी आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचे चित्र दिसत आहे.
चांदुर बाजार पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तळेगाव मोहना ग्रामपंचायत मधील सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी याचा भ्रष्टाचार चा विषय आता चांगलाच रंगात असल्याचे दिसत आहे.स्वच्छता म्हणून या गावात कोठेच दिसत नसून जागो जागी आणि प्रत्येक प्रभाग मध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा ढीग दिसत आहे.राज्य सरकार कडून येणाऱ्या 14 वा वित्त आयोग हा कोठे वापरला जात आहे याची माहिती सुद्धा तळेगाव मोहना येथील नागरिकांना नाही.
तसेच उमेश श्रीराम आकोलकर यांचे नाव ग्रामपंचायत च्या रजिस्टर वर आठ-अ वर घेऊन त्यांना मालमत्ता क्रमांक 737 देण्यात आला.त्याच प्रमाणे ग्रामपंचायत हद्दीत मालकी हक्काचे दस्तऐवज नसून तब्बल 51 लोकांची आठ-अ वर फेरफार घेण्यात आली तसेच सरपंच बंधू यांचे आठ-च्या रजिस्टर वर खोडतोड करून नाव टाकण्यात आल्याचा आरोप अब्दुल राजीक यांनी केला.
ग्राम विकास अधिकारी हे मुख्यलयीन राहत नसून गावचा मोठ्या प्रमाणवर विकास खुंटला आहे.तर 14 वा वित्त आयोग द्वारे निधीचा उपयोग कोठे कोते आहे?अशा प्रश्न गावकरी विचारत आहे.गावातील स्मशानभूमीत ओसन पडून आहे पुतळा सौंदर्यीकरण अजून झाले नसल्याने ग्रामपंचायत प्रति नागरिकांचा मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळत आहे.
तर ग्रामविकास अधिकारी अजय देशमुख यांच्या या ठिकाणी मनमानी कार्यभार दिसत आहे.त्याच्या कार्यलयात माहिती घेण्यासाठी गेलो असता ते कार्यलयात हजर नव्हते मात्र फॅन सुरूच होता त्यामुळे विजेचा मोठ्या गैर उपयोग होताना दिसत आहे.तर या सर्व कार्यवाही करण्यासाठी अब्दुल राजीव यांनी पंचायत समिती कडे वारंवार तक्रार केली मात्र अधिकारी कार्यवाही करीत नसल्याने त्याच्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे असे त्यांनी गाव माझा शी बोलताना सांगितले.तर नुकतीच घेण्यात आलेली ग्राम सभा ही विना मुनादि देऊन घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया:-
अधिकारी हा प्रशासन आणि गावकरी या मधील दुवा असतो मात्र तळेगाव मोहना या ठिकाणचे ग्रामविकास अधिकारी मुख्यलयीन राहत नाही त्यामुळे गावात अस्वच्छता बरोबर अस्वच्छ कार्यभार सुरू आहे याची वारंवार तक्रार केली मात्र कार्यवाही काहीच झाली नाही.त्यामुळे वरिष्ठ अधिकारी याला खतपाणी घालत आहे.
अब्दुल राजीक तळेगाव मोहना तक्रार कर्ते.

मी बाहेत जात आहे.तुम्हाला काय काम आहे तर उद्या या.आता मला वेळ नाही.असे ग्रामविकास अधिकारी अजय देशमुख यांनी फोनवरून संपर्क केला असता सांगितले.