उस्मानाबाद – साडेसहा महिन्याच्या बाळाला बालरोगतज्ञ -डाँ अशोक धुमाळ व डाँ मुकुंद माने यांनी दिले जिवदान

0
2198
Google search engine
Google search engine

बालरोगतज्ञ- डाँ अशोक धुमाळ जिल्हा स्त्री रुग्णालय ,उस्मानाबाद

हेच ते ६४० ग्रँम वजनाचे बाळ झाले १३०० ग्रँम वजन

बालरोगतज्ञ – डाँ मुकूंद माने जिल्हा स्त्री रुग्णालय उस्मानाबाद

उस्मानाबाद – उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका कमी दिवस भरलेल्या महिलेला जन्मलेल्या सहाशे चाळीस ग्रॅम वजनाच्या बाळाला वाचवण्यामध्ये उस्मानाबाद स्त्री जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉक्टरांना यश आले आहे उस्मानाबाद येथील उंबरे कोठा येथील शितल रविंद्र झोंबाडे शितल रविंद्र झोंबाडे यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होत त्यांची साडेसहा महिन्यातच प्रसुती झाल्यामुळे बाळाची प्रक्रती चिंताजनक होती त्या बाळाला उपचारासाठी ४ जुलै रोजी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यापूर्वी त्या महिलेला खाजगी रुग्णालयात अँडमिट करण्यात आले होते तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या गर्भाशयामध्ये दोन जुळे बाळ असल्याचे डाँक्टरांच्या निदर्शनास आले होते त्या महिलेले 26 आठवडे झाले होते (साडे सहा महिने ) सदर महिलेची प्रसूती झाली त्यावेळी त्यांना दोन जुळ्या मुली जन्मल्या त्यापैकी एक मुलगी मयत झाली व एक जिवंत आहे तीचे वजन फक्त ६४० ग्रँम होते त्या जिवंत मुलीला वाचवण्यासाठी येथील जिल्हा रुग्णालयातील दाखल करण्यात आले होते येथील बालरोग तज्ञ डॉक्टर अशोक धुमाळ व डॉक्टर मुकुंद माने या दोघांनी आतोनात प्रयत्न करून त्या मुलीला वाचवले त्या मुलीचे वजन जन्मता 640 ग्रॅम आसल्यामुळे ती मुलगी वाचेल का नाही याची शक्यता कमी होती परंतु देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे त्या मुलीवर डॉक्टरांनी तब्बल अडीच महिने उपचार केले तिचे सध्या १३०० ग्रॅम वजन वाढले आहे सुरवातीला जन्मल्यानंतर त्या मुलीला श्वासाचा त्रास सुरू झाला होता तिला कृत्रिम श्वास देऊन नऊ दहा दिवस ठेवण्यात आले होते त्यानंतर तीने स्वतः श्वास घ्यायला सुरुवात केली डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद देत होती नंतर तिला कांगारू मदर केअर पद्धत अवलंबून तिला नळीने दूध देणे चालू केले त्यानंतर तिने त्याही उपचाराला प्रतिसाद दिला त्यामुळे तीला जिवदान मिळाले उस्मानाबाद जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे या रुग्णालयात सुविधांचा अभाव असतानाही डॉक्टरच्या प्रयत्नाला हे मोठे यश आल्याची चर्चा आहे एवढ्या कमी वजनाचे बाळ एक दिवशी वाचू शकत नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे परंतु त्यांनी बाळाला वाचण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू केले होते त्यांनी केलेल्या उपचारांमुळे बाळ वाचले डाँक्टरांनी केलेल्या प्रयत्नाचे सर्व स्तरात कौतुक होत आहे त्या बाळावर उपचार पूर्ण करून १२ सप्टेंबर रोजी त्या बाळाची सुट्टी करण्यात आली आहे सध्या बाळ ठणठणीत झाल्यामुळे झोंबाडे परिवारातील सदस्य आनंदी वातावरणात दिसत होते दरम्यान स्त्री जिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ञ डाँ अशोक धुमाळ व डाँ मुकूंद माने यांनी झोंबाडे परिवाराचा सत्कार केला यावेळी रुग्णालयातील आधीकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते