विनयभंग प्रकरणी शिक्षणाधिकारी सचिन जगताप निलंबीत ,शिक्षण विभागात खळबळ

0
4383

शिक्षणाधिकारी सचिन जगताप

 

उस्मानाबाद येथील शिक्षणाधिकारी सचिन जगताप

उस्मानाबाद -उस्मानाबाद येथील शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर आज निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे या कार्यवाहीमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे पुढिल आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला येईपर्यंत निलंबीत राहतील असे पत्रात नमुद करण्यात आले आहे उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील एका शिक्षिकेने शिक्षणअधिकारी सचिन जगताप यांच्यावर शिक्षण विभागातील महिलेने आनंद नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता नंतर जगताप हे फारार होते त्यांना न्यायालयाने अटपूर्व जामिन नामंजूर केल्यामुळे सचिन जगताप हे स्वताहून २२ मे रोजी आनंद नगर पोलिस हजर झाले होते त्यांची चार दिवसासाठी न्यायालयीन कोठडित रवानगी करण्यात आली होती जगताप यांना अटक केलेल्या वेळेपासून ४८ तासापेक्षा जास्त वेळ पोलिस कोठडित असल्याने महाराष्ट्र नागरी सेवेच्या नियमाप्रमाणे निलंबन केल्याचे आदेशात म्हाटले आहे
हा आदेश अप्पर मुख्य सचिवांनी काढला आहे आहे आदेश आमलात असेपर्यत सचिन जगताप यांना शासनाच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही तसेच त्यांना खाजगी नौकरी किंवा व्यवसाय करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे असे वर्तन केल्यावर त्यांना दोषी ठरवून कार्यवाही करण्यात येईल यात त्यांना दोषी ठरवून निर्वाह भत्त्याचा हक्क गमवावा लागेल असे आदेशात म्हटले आहे