शासन तुमच्या दारी संकल्पना साकारताना समतादूत प्रत्यक्षात दारोदारी – स्वाधार योजनेचा प्रचार व प्रसार

0
779
Google search engine
Google search engine

अकोला/विशेष प्रतिनिधी:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनांचा प्रचार व प्रसार समतादूत़ांना विविध महाविद्यालयामध्ये जाऊन करण्यात येत असुन अनुसूचित जातीच्या विघार्थ्यांच्या वर्गात जाऊन स्वाधार योजनेची माहिती सांगुन त्यांच्याकडुन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या उपक्रमातुन शासन तुमच्या दारी ही संकल्पना साकारतांना अकोला जिल्ह्यात विविध विघालयामध्ये समतादूत थेट प्रत्यक्षात दारोदारी विघार्थ्यांपर्यंत जाऊन साकार करीत आहेत वंचित व दुर्बल घटकातील अनुसूचित जातीच्या विघार्थ्यांना शैक्षणिक जिवनाला आधार मिळावा म्हणून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, सचिव दिनेश वाघमारे, बार्टी महासंचालक कैलास कणसे, समाजकल्याण आयुक्त शिक्षण माधव वैघ ,मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या शासन तुमच्या दारी हि संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी अकोला सहाय्यक आयुक्त यावलीकर साहेब,विभागीय प्रकल्प संचालक राहुल कराळे, अकोला प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था समतादूत वैशाली गवई,रविना सोनकुसरे यांनी अकोला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील कार्यशाळेसह दारोदारी थेट रस्त्यावर विघार्थ्यांन पर्यंत प्रचार व प्रसार कार्य महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वी राबविण्यात आला आहे. अशी माहीती कळवण्यात आली आहे.सदरील उपक्रमास महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, व पालकांचा प्रतिसाद मिळाला. या समतादूत स्तुत्य उपक्रमाबद्दल परिसरातुन आनंद व समाधान व्यक्त होत आहे.