👉🏻शिरजगाव बंड ग्राम पंचायत हद्दीमधील अतिक्रमण प्रकरण मध्ये उपोषण कर्ते आणि अतिक्रमण धारक यांच्या वर गुन्हे दाखल

0
1019
Google search engine
Google search engine

👉🏻शिरजगाव बंड ग्राम पंचायत हद्दीमधील अतिक्रमण प्रकरण मध्ये उपोषण कर्ते आणि अतिक्रमण धारक यांच्या वर गुन्हे दाखल,
👉🏻दोघांनी केले होते शासकीय जागेवर अतिक्रमण
👉🏻शासकीय जागेवरील अतिक्रमण काढून भूमिअभिलेख कार्यलाय यांच्या अहवाल वरून चांदुर बाजार पोलिसांनी केली गुन्ह्याची नोंद

चांदुर बाजार :-प्रतिनिधी

चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीमधील शासकीय जागेवर केलेले अतिक्रमन काढण्यासाठी स्थानिक रहिवाशी सुरेश भेले यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.या मध्ये तब्बल 6 दिवसांनी उपोषणाची दखल घेण्यात आली .आणि भूमिअभिलेख कार्यलाय चांदुर बाजार मधील अधिकारी यांनी यांनी मौका पाहणी केली.यांनी त्या जागेबाबत योग्य अहवाल दिला.त्यानंतर ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कार्यलाय मधील कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यावर पोलिसांचा बंदोबस्त मिळाला.
त्यानंतर चांदुर बाजार चे प्रभारी तहसीलदार नीलिमा मते यांनी उपोषण ठिकाणी भेट देऊन सुरेश भेले याना पाणी देऊन उपोषण सोडले.
तसेच ग्रामपंचायत सचिव आणि चांदुर बाजार पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी आणि त्याची टीम च्या बंदोबस्त मध्ये अतिक्रमण काढण्यात आले.मात्र उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यलाय यांनी दिलेल्या अहवाल वरून उपोषण कर्ते सुरेश भेले आणि ज्ञानेश्वर लोखंडे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचा अहवाल दिला.याच अहवाल च्या आधारे चांदुर बाजार पोलिसांनी उपोषणा कर्ते आणि अतिक्रमण धारक दोघे वर गुन्हची नोंद करण्यात आली.यामध्ये बीपी ऍक्ट 120 प्रमाणे त्याच्या वर गुन्हची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.