चांदुर बाजार तालुक्यात बोगस आधारकार्ड ,तहसिल च्या सतर्क मुळे आला प्रकार उघडीस. लाभार्थी यांचा शासकीय लाभ थांबविला

0
910
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार तालुक्यात बोगस आधारकार्ड ,तहसिल च्या सतर्क मुळे आला प्रकार उघडीस.
लाभार्थी यांचा शासकीय लाभ थांबविला.
चांदुर बाजार :-प्रतिनिधी बादल डकरे
चांदूर बाजार तालुका तहसील कार्यालयामध्ये वय वाढवून तयार करण्यात आलेली बोगस आधारकार्ड पकडण्यात आली आहेत. तहसील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पकडण्यात आलेल्या सर्व आधारकार्ड धारकांचे शासकीय योजनांचे लाभ थांबवण्यात आले आहेत.
तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. सर्व शासकीय योजनांमध्ये लाभ मिळवण्यासाठी आधारकार्ड हे आवश्यक आहे. त्याकरता प्रत्येक लाभार्थ्याचे आधारकार्ड हे संबंधित योजनेशी लिंक करण्याचे काम चांदूर बाजार तहसीलचे अधिकारी कर्मचारी करत होते. या विभागातील कर्मचाऱ्यांना काही लाभार्थ्यांचे आधारकार्डवरील वय वाढवून दिले असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी कार्डवरील बारकोड तपासून पाहिला असता, ते कार्ड बोगस असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आधारकार्ड तपासणी मोहीम हाती घेतली. यात २० ते २५ आधारकार्ड बोगस असल्याचे आढळून आले, अशी माहिती नायब तहसीलदार गजानन पाथरे यांनी दिली.
या आधारकार्डच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, जेष्ठ नागरिकांना प्रवास करताना मिळणारी सूट, अशा प्रकारचे फायदे देण्यात येतात. मात्र हा लाभ मिळवण्यासाठी आधारकार्डवरील वय वाढवून देण्याचा गोरखधंदा जिल्ह्यात सुरू असल्याचे उघड झाले आहे. तपासणीदरम्यान आढळलेल्या सर्व बोगस आधारकार्ड धारकांचे विविध योजनांचे लाभ सध्या थांबवण्यात आले असल्याचेही तहसील कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात अशा किती टोळ्या सक्रिय आहेत?त्यामुळे त्यांच्यावर उचित कार्यवाही होणे आवश्यक आहे.