अकोट/ प्रतीनीधी- शहर पोलिसांनी आठवडी बाजार अकोट येथील देशी विदेशी दारू विक्रीचे दुकान मध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यास गजाआड करून त्याचे कडून चोरी गेलेले नगदी रू व विदेशी दारु क्वार्टर असा 3850/- रु चा माल जप्त केला
प्राप्त माहितीनुसार अरुण कुमार द्वारकालाल जयस्वाल यांचे आठवडी बाजार येथिल देशी विदेशी दारू विक्री दुकानात दि 12/09/18 चे रात्रीला कुणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानचे शटर चे कुलुप तोडुन दुकानात आत प्रवेश करुन दुकानातील इम्पेरीअल ब्लु कंपनीची व्हीस्की विदेशी दारु चे 35 क्वार्टर कि 4900/- रु व नगदी 500/- रु असा एकूण 5400/-रु चा माल चोरुन नेल्याचा पो स्टे ला रिपोर्ट दिल्या वरुन अज्ञात आरोपी विरुध्द अप क्र 329/18 कलम 457,380 भा द वि चा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक श्री गजानन शेळके यांनी गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिल्यावर गोपनीय माहिती वरून अजय नागोराव वैद्य वय 40 वर्ष रा गवळी पुरा अकोट यास अटक करून त्याचे जवळुन चोरलेले I B व्हीस्की 25 क्वार्टर व नगदी 350/- रु असा एकूण 3850/- रु माल जप्त करून शोध लावला ही कार्यवाही पो नि श्री गजानन शेळके यांचे मार्गदर्शनाखाली डी बी पथकचे स पो नि श्री डी एन फड पोहेका संजय घायल गोपाल अघडते ,राकेश राठी,सुलतान पठाण विजय सोळंके यांनी केली