संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगावच्या कर्मचाऱ्यांची केरळच्या पुरग्रस्तांना मदत

0
866

आकोट/संतोष विणके संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगावच्या कर्मचाऱ्यांची केरळच्या पुरग्रस्तांना आर्थिक मदत पाठवत संत गजानन महाराजांच्या सेवाकार्याच्या विचारांची नाळ कायम ठेवली आहे. काल केरळ मुख्यमंत्री आपत्कालीन साहायता निधी फंडाला मदतीसाठी श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथील कर्मचारी मंडळींनी आपल्या वेतनातुन प्रत्येकी 500 रू याप्रमाणे निधी गोळा करून तसेच विश्व़स्त समिती संस्थान तर्फे एकुण 11000 हजाराचा धनादेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम पाटसुलचे डॉ. उद्धवरावजी गाडेकर महाराज यांच्या उपस्थितीत जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला यांना पाठवण्यात आला. गाडेकर महाराजांच्या हस्ते या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी खालील गणमान्य व्यक्तीची उपस्थिती होती. विश्व़स्त मंडळ , ज्वारसिंग आसोले, गणेश कळसकर, विलास बहादुरे, राजेश खोकले ,डॉ प्रविण काळे ,महेश गाढे ,शरद सोनटक्के ,विजय ढोरे, गणेश ढोले, लाभली त्या प्रमुख्याने श्री पोटे महाराज धनंजय वांगे, गजानन वारकरी ,मिलिंद तळोकार,तसेच कर्मचारी प्रशांत आकोते, शरद म्हैसने, शुभम हाडोळे, गजानन इंगळे, रामदास महाले, वसंत पनायकर, पंकज चौधरी, वसंता खोले, हरसिंग रहेनवाल, सविता गवई, यशोदा गवई हे उपस्थित होते.श्रींच्या भक्तांची ही मदत शेगावीच्या राणा संत गजानन महाराजांच्या अध्यात्म सेवाकार्यला वाढवणारा ठरला यात तिळमात्र शंका नाही.