दुष्काळी कविता चांगलीच गाजली

0
1241
Google search engine
Google search engine

कविता
—————————————
आभाळ
—————————————
पावसा रिमझिम केलास
हिरवा डोंगर दिलास
पिकाला सुकवून गेलास
डोळं आभाळाकडं लावलास
तिकडं मनसोक्त कोसळलास
इकडे पाठ फीरवलास
दुष्काळात लोटू नकोस
सूड उगावू नकोस
तुझ्या न येण्यानं
आमचं हारवलं जगनं
सततच्या दुष्काळानं आमचं
जनू मोडलं कंबरडच
तुझ्या वांझुट्या रंगाला
तुझ्या पांढ—या मनाला
पांन्हा फुटेल का ?
भेगा बुजवशील का?

आता तरी बरस
जीव झालाया तरस
पाण्यासाठी जीव टांगणीला
सततचा दुष्काळ नशिबाला …!

—————————————
प्रा.राजा जगताप
उस्मानाबाद
——————————————