तेरच्या तरुणांनी बस स्थानक परिसर स्वछ करून पुढार्यांना संदेश भेट

0
813

उस्मानाबाद – तेर येथील बस स्थानक परिसरात घाणिचे साम्राज्य या विषयाची बातमी विदर्भ 24 ने लावून धरली होती या बातमीची दखल घेऊन तेर येथील तरुणांनी पुढाकार घेऊन बस स्थानक परिसरातील घाणीची स्वछता करण्यास सुरावात केली आहे तेर परिवर्तन विकास ग्रुप या ग्रुपमधील सदस्य तानाजी पिंपळे ,विलास टेळे ,केशव सलगर , भोंडवे काकासाहेब ,ज्ञानेश्वर खरात ,विश्वंभर काळे तेर येथील अपसर भाई यांची जेसीबी लावून परिसर स्वछ करण्याचे काम सुरु करून पुढार्यांना लाजवणारा संदेशच असे म्हणावे लागेल हे काम तरुणांनी सुरु केले आहे येथील प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन झाडे लावणे , लाल माती टाकून स्वछ ग्राऊंड तयार करणे , लहान मुलांना खेळणे उभी करणे , बसण्यासाठी दहा ते विस बेंच करणे हा ग्रुप त्या ग्रुपचे विचार आहे आणि विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाशी संबध नाहीया ग्रुपचा उद्देश हा परिसर स्वछ करून लोकांची मानसिकता बदलणे हा आहे