👉🏻चांदुर बाजार पोलीस यांची धडक कार्यवाही,स्थानिक कसाब पुरा येथुन तब्बल 40 किलो गौमास विक्री करणाऱ्यास अटक

0
1186
Google search engine
Google search engine

👉🏻चांदुर बाजार पोलीस यांची धडक कार्यवाही,स्थानिक कसाब पुरा येथुन तब्बल 40 किलो गौमास विक्री करणाऱ्यास अटक,

👉🏻ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कार्यवाही

चांदुर बाजार:-बादल डकरे

चांदुर बाजार पोलिसांनी होत असलेल्या गौमास विक्री चा डाव हाणून पाडला.यामध्ये चांदुर बाजार पोलिसांनी स्थानिक चांदुर बाजार ठिकाणी पोलीस पेट्रोलीग करीत असताना त्यांनी एक आरोपी आणि त्याच्या कडील गौमास तसेच विक्री करण्यासाठी असलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले.

यामध्ये आरोपी मो.नोशाद अब्दुल रहीम रा.कसाब पुरा चांदुर बाजार याला अटक करण्यात आली.तसेच त्याच्यावर प्राणी संरक्षण कायदा आणि गौवंश हत्या बंदी कायदा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

सदर कार्यवाही ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशीष चौधरी ,पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे,आणि त्यांच्या टीम ने ही कार्यवाही केली.